विशेष प्रतिनिधी
चंडीगड – हरियानाच्या भिवानी जिल्ह्यामध्ये दादम खाण क्षेत्रामध्ये झालेल्या भूस्खलनात चार मरण पावले तर ढिगाऱ्याखाली अनेकजण अडकून पडल्याची भीती व्यक्त होते आहे.Four died in Haryana in landslide
जवळपास सहापेक्षाही अधिक डम्पर ट्रक आणि यंत्रे ढिगाऱ्याखाली गाडली गेल्याची भीती व्यक्त होते आहे. तोशाम ब्लॉक भागामध्ये ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिलीया दुर्घटनेत मरण पावलेल्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त करतानाच आपण सातत्याने स्थानिक परिस्थितीचा आढावा घेत आहोत असे सांगितले. घटनास्थळी बचावपथके आणि डॉक्टरांची पथके रवाना झाली आहेत. सध्या आमचा पहिला प्रयत्न हा जखमींना वाचविणे हाच असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App