विशेष प्रतिनिधी
डेनव्हर – कोलोरॅडो राज्यातील डेनव्हरच्या जंगलातील आगीच्या ज्वाळांमध्ये परिसरातील सुमारे ५८० घरे, हॉटेल आणि एक व्यापारी संकुल भस्मसात झाले आहे. त्यामुळे हजारो रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे.Huge fire in USA forest
कोलोरॅडोच्या जंगलात हा वणवा गुरुवारी भडकला. ६.५ वर्ग किलोमीटर परिसरात आग फैलावल्याने अनेक भाग धुराने गुदमरले आहेत. आकाशात आगीच्या ज्वाळा दिसत आहेत.या परिसरात १६९ किलोमीटर प्रती तीस वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे वणव्याची व्याप्ती वाढणार असल्याने नागरिकांना त्याचा मोठा फटका बसण्याची भीती आहे.
यामध्ये मृत्यू व जखमींची संख्याही वाढू शकेल. ही आग एवढी भीषण आहे की, ती तातडीने नियंत्रणात येणे अवघड आहे. वणव्यामुळे लुईसव्हिले हे २१ हजार लोकसंख्येचे शहर रिकामे करण्याचा आदेश दिला आहे. याआधी सुपिरियर शहर सोडण्याचा आदेश नागरिकांना देण्यात आला होता. तेथील लोकसंख्या १३ हजार आहे. हे शहर डेनव्हरच्या उत्तर- पश्चिमेकडे साधारणपणे ३२ किलोमीटर अंतरावर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App