विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली – भारत आणि पाकिस्तानने आपापल्या देशातील आण्विक केंद्रे आणि त्यातील सुविधांची यादी परस्परांना राजनैतिक माध्यमातून सुपूर्द केली. यासोबतच, आपापल्या देशात असलेल्या कैद्यांची यादी देखील दोन्ही देशांनी एकमेकांना दिली आहे. यानुसार पाकिस्तानच्या ताब्यात सुमारे ६०० हून अधिक भारतीय नागरिक असल्याचे सांगण्यात आले.Pak captured 577 indian fisherman
भारत आणि पाकिस्तान दरम्यान आण्विक केंद्रांच्या माहितीचे आदानप्रदान संभाव्य हल्ल्याच्या प्रतिबंधात्मक कराराअंतर्गत होत असते. याबाबतचा करार ३१ डिसेंबर १९८८ मध्ये करार झाला होता आणि त्याची अंमलबजावणी २७ जानेवारी १९९१ पासून सुरू झाली आहे.
याअंतर्गत आण्विक केंद्रांची, त्यातील सुविधांची यादी वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजेच एक जानेवारीला दिली जाते. यासोबतच, दोन्ही देशांनी आपापल्या तुरुंगात असलेल्या कैदी, मच्छीमारांच्या यादीचीही देवाणघेवाण केली.
यात भारताच्या तुरुंगात असलेल्या २८२ पाकिस्तानी कैद्यांचा आणि ७३ मच्छीमारांचा तपशील पाकिस्तानला देण्यात आला. तर पाकिस्तानकडून भारताला ५१ भारतीय कैद्यांची आणि ५७७ मच्छीमारांची माहिती देण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App