विशेष प्रतिनिधी
श्रीनगर : जम्मू आणि काश्मीरमधील कलम ३७० रद्द करून राज्याचा दर्जा काढून घेतल्यानंतर सकारात्कमक बदल घडत आहेत. काश्मीरमध्ये दहशतवाद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सक्रिय दहशतवाद्यांची संख्या दोनशेहून कमी झाली आहे. तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करण्याच्या कारवायांवर करडी नजर ठेवली जात आहे.The situation improved after the repeal of Article 370, the number of active terrorists in Kashmir is less than two hundred
अनंतनाग जिल्ह्यातील काजीगुंड येथे पत्रकार परिषदेत काश्मीरचे पोलीस महानिरीक्षक विजय कुमार आणि लष्कराच्या १५ व्या विभागाचे जनरल आॅफिसर कमांडिग लेफ्ट. जनरल डी. पी. पांडे यांनी सांगितले की, काश्मीर खोºयातीलसुरक्षा स्थिती सुधारली आहे. या वषार्तील सुरक्षा दलाने राबविलेल्या मोहिमा गुप्त माहितीवर आधारित होत्या. काश्मीर खोºयातील सक्रिय दहशतवाद्यांची संख्या कमी होऊन १८० झाली आहे, असे पांडे यांनी सांगितले.
दहशतवाद सुरू झाल्यापासून पहिल्यांदाच सक्रिय दहशतवाद्यांची संख्या दोनशेहून कमी झाली आहे. स्थानिक दहशतवाद्यांची संख्याही ८५ किंवा ८६ आहे, असे विजय कुमार यांनी सांगितले. या वर्षी आतापर्यंत १२८ तरुण दहशतवादी संघटनात सामील झाले आहे. यापैकी ७३ जण विविध चकमकीत मारले गेले, तर १६ जणांना अटक करण्यात आली आहे.
लेफ्ट. जनरल पांडे यांनी सांगितले की, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २०२१ मध्ये दहशतवादी संघटनेत तरुणांच्या भरतीचे प्रमाणही कमी झाले आहे. मागच्या वर्षी ही संख्या १८० पेक्षा अधिक होती. यावरून समाज जागृत झाल्याचे दिसते. २० ते २१ वषार्चे तरुण दहशतवादी संघटनांच्या चिथावणीला बळी पडत नसल्याने दहशतवादी संघटनांनी १५ ते १६ वर्षाच्या मुलांची भरती सुरू केली आहे. नियंत्रण रेषेवरील स्थिती ठीक असून शस्त्रबंंदीचे पालन केले जात आहे.
काश्मीरमध्ये विघटनवादी नेत्यांवर कडक नजर ठेवण्यात आली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यावर पोलीस यंत्रणेत अनेक सुधारणा करण्यात आल्या आहेत. या सगळ्याचा परिणाम सध्या काश्मीरमध्ये दिसत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App