विशेष प्रतिनिधी
मुंबई : समलैंगिक संबंधांना विरोध केल्यामुळे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना अभिनेत्री सोनम हिने अडाणी म्हटले आहे. आशिक्षित, दूर्लक्ष आणि द्वेषपूर्ण भाषण असे सोनमने केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.Actress Sonam called Sudhir Mungantiwar an idiot for opposing homosexuality
सोनमने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी एलजीबीटी समुदायातील सदस्यांना सहभागी करुन घेण्याला विरोध दर्शवताना त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केली. समलैंगिक संबंध ठेवणाºयांना तुम्ही सदस्य नियुक्त करता, काही गांभीर्य आहे का, हे विधेयक आहे.
अजुन अनैसर्गिक संबंधांची परिभाषाही नाही, कोण सिद्ध करणार हे, काय कायदे करतोय आपण असे अनेक प्रश्न त्यांनी मांडले. त्याचा हा व्हिडीओ सोनमने शेअर केला आणि म्हणाली, अशिक्षित, दुर्लक्ष करणारं आणि द्वेषपूर्ण असे कॅप्शन सोनमने शेअर केले आहे. सोनमची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.
बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ती चाहत्यांच्या संपर्कात राहते. सोनम ही अभिनेते अनिल कपूर यांची कन्या आहे. तिने दिल्लीतील एका उद्योगपतीशी विवाह केला आहे. सोनम सगळ्यात शेवटी एके वर्सेस एके या चित्रपटात दिसली होती.
त्या आधी सोनम जोया फॅक्टरमध्ये दिसली होती. सोनमने सांवरिया या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तर याशिवाय सोनम दिल्ली-6, खूबसूरत, नीरजा, प्रेम रतन धन पायो, वीरे दी वेडिंग आणि रांझणा या चित्रपटांमध्ये दिसली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App