काँग्रेस मोठा पक्ष पण त्यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद मिळवता आले नाही
विशेष प्रतिनिधी
मुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या राष्ट्रव्यापी नेतृत्वाचा मोठेपणा सांगताना शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी काँग्रेसला टोचले आहे. Sanjay raut questions Congress leadership over political capacity
शरद पवार हे मोठे नेते आहेत. देशपातळीवर नेतृत्व करण्याची त्यांची क्षमता आहे. आम्ही सगळ्यांनी मिळून संयुक्त लोकशाही आघाडी अर्थात युपीए बळकट करण्याची गरज आहे. यूपीए बळकट झाली तर केंद्रातील सरकारला परिणामकारक विरोध करता येईल, असे संजय राऊत यांनी सांगितले. त्याचबरोबर काँग्रेसची मर्यादा त्यांनी लक्षात आणून दिली.
यूपीएमध्ये काँग्रेस हा मोठा पक्ष आहे हे मान्य. परंतु सलग दोन निवडणुकांमध्ये त्यांना लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद मिळेल एवढ्या जागा मिळाल्या नाहीत याची आठवण राऊत यांनी करून दिली. अशा स्थितीत पवारांसारखा ज्येष्ठ नेता यूपीए चेअरमन झाला तर शिवसेनेला आनंद होईल, अशी टिप्पणीही राऊत यांनी केली.
काँग्रेसच्या लोकसभेतील कमी झालेल्या आकड्याचा उल्लेख करताना राऊत यांनी राष्ट्रवादीचा लोकसभेतील आकड्याविषयी मात्र भाष्य केले नाही. लोकसभेत 55 खासदार असलेली काँग्रेस “कमकुवत” आहे, पण ५ खासदार असलेली राष्ट्रवादी “बळकट” आहे, असेच राऊत यांनी सूचित केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App