– लव्ह जिहाद पसवल्यास, बळजबरीने धर्मांतर केल्यास अनुदान थांबवणार सरकारी जमिनी काढून घेणार
विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्यप्रदेशात प्रस्तावित लव्ह जिहाद विरोधातील कायद्याच्या कक्षेत मदरसे, शाळा आणि चर्च यांना आणणार असल्याचे शिवराज सिंह चौहान सरकारने स्पष्ट केले आहे. लव्ह जिहादसाठी मुलांना मानसिकदृष्ट्या तयार करणे, त्यांच्यात जिहादची भावना बळावणे, मुलींचे बळजबरीने धर्मांतर करणे अशा बाबींमध्ये मदरसे, शाळा अथवा चर्च गुंतलेले आढळल्यास त्यांचे परवाना रद्द करणे, त्यांचे सरकारी अनुदान थांबविणे तसेच त्यांना सरकारी जमीन दिली असेल तर ती काढून घेणे अशा कठोर तरतुदी या कायद्यात करण्यात आलेल्या आहेत.
Madarasas, schools, churches to be brought in ambit of love jihad law in Madhya Pradesh
मध्यप्रदेशातील बेटी बचाव अभियानाअंतर्गत संबंधित कार्य असेल, असे मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी स्पष्ट केले. लव्ह जिहाद साठी मुलांची मानसिकता तयार करण्यावरच कुठाराघात केला पाहिजे. त्यांच्यावर तसे संस्कार करणाऱ्यांना जरब बसवली पाहिजे, यासाठी कायद्याच्या कक्षेत मदरसे शाळा आणि चर्च यांना आणण्यात येणे गरजेचे आहे त्यातूनच हे पाऊल उचलण्यात आले असेल सरकारी सूत्रांनी सांगितले. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हा कायदा मध्य प्रदेश विधानसभेत मंजूर होणे अपेक्षित आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App