वृत्तसंस्था
भोपाळ : कालीचरण महाराज यांना मध्य प्रदेशातून अटक करण्यात आली आहे. आज पहाटे त्यांना पोलिसांनी अटक केल्याचे वृत्त आहे.nsults about Mahatma Gandhi; Kalicharan Maharaj arrested from Madhya Pradesh
धर्मसंसदेत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल अपशब्द काढलं होते. त्यामुळे त्यांच्यावर देशभरातून टीकेची झोड उडाली होती. विविध राजकीय पक्ष आणि नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांच्या अटकेची मागणी केली होती.
त्यांच्याविरोधात विविध पोलिस ठाण्यात तक्रारी सुद्धा दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या अटकेची शक्यता वाढली होती. धर्मसंसदेत त्यांनी केलेल्या भाषणात भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास सांगितला.
त्यावेळी त्यांनी महात्मा गांधी यांच्याविरूद्ध अपशब्द काढल्यामुळे संतापाची लाट उसळली होती. त्यानंतर आज अखेर त्यांना मध्यप्रदेशात पहाटे पोलिसांनी अटक केली. त्यांच्या अटकेसाठी महाराष्ट्र आणि मध्यप्रदेश सह विविध ठिकाणी पथके पाठविण्यात आली होती.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App