विशेष प्रतिनिधी
नाशिक : उद्धव ठाकरेंची धमकी काय असते, याचा अनुभव महाराष्ट्रात घेतो आहे. मी राज्यपाल आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनाही ओळखतो. ते महाराष्ट्रात आले नव्हते, तेव्हापासून त्यांचे आणि माझे चांगले संबंध आहेत. राज्यपालांना कोण धमकी देणार? हा साधा सरळ विषय आहे. विधानसभा अध्यक्षपदावरून भ्रम निर्माण झाला. राज्यपालांनी कळवलं. आम्ही मान्य केलं. ते अत्यंत सभ्य गृहस्थ, सुस्वभावी आहेत.Dismissed majority government Is it child’s play? : sanjy Raaut
पोलिस भरती गैरव्यवहाराची कागदपत्रे माझ्याकडे आली होती. ती मी मुख्यमंत्र्यांकडे दिली आहेत. हे प्रकरण गंभीर आहे, राज्य सरकार बरखास्त नाही केले, तर नाव बदलू, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले होते. या वाक्याच्या संदर्भ घेत राऊत म्हणाले की, त्यांना नाव बदलावेच लागेल.
मला त्यांचे नाव आवडते. मात्र, त्यांच्यासाठी नाव बदलण्याची व्यवस्था करू. बहुमतातले सरकार बरखास्त करणे पोरखेळ आहे का, राष्ट्रपती तुमच्या घरी चंद्रपुरात, जंगलात गोट्या खेळत आहे का, त्यांचा स्टांप आणून ठेवलाय का, असा सवाल त्यांनी केला.
नारायण राणे यांनी पोलिसांना सहकार्य करावे. गुन्हेगारांना पाठिशी घालू नये. नितेश पाताळात लपले असतील तरी त्यांना शोधून काढू, असा दावा बुधवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते नाशिकमध्ये बोलत होते. एकीकडे सिंधुदुर्ग न्यायालयात नीतेश यांच्या जामीन अर्जावर सुनावणी सुरू आहे, तर दुसरीकडे संजय राऊत यांनी राणे पिता-पुत्रांवर टीकेची झोड उठवली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App