विशेष प्रतिनिधी
मुंबई : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन पाचच दिवसांचे होते. शेवटच्या दिवशी विधानसभा अध्यक्षांची निवडणूक घेण्याचा आग्रह धरल्यामुळे महाविकास आघाडीच्या ठाकरे – पवार सरकारवर तोंडघशी पडण्याची वेळ आली, पण तरीही आजचा शेवटचा दिवस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप यांच्यातल्या विशेष प्रेम संबंधांचा ठरला…!! Ajit pawar – BJP political love story
अजितदादांनी दुपारी भाजपच्या १२ निलंबित आमदारांची बाजू लावून धरली. विधानसभेत भाषण करताना त्यांनी अध्यक्षांना सूचना केली, की कोणी चुकले असेल तर त्याला चार तास बाहेर ठेवा. फारतर दिवसभर बाहेर ठेवा. पण वर्षभरासाठी बाहेर ठेवणे योग्य नाही. अजितदादांनी त्यांच्या या वक्तव्यातून भाजपच्या १२ आमदारांना निलंबन रद्द होण्याचा दिलासा दिला… पण तो हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी…!!
हिवाळी अधिवेशन : अजित पवारांचा भाजपच्या सुरात सूर, १२ आमदारांच्या निलंबनावर म्हणाले- एकदम १२ महिने कुणाला बाहेर पाठवू नका!
तरी देखील अजितदादांनी दाखविलेल्या या प्रेमाची परतफेड भाजपचे वरिष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. संपूर्ण अधिवेशन काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विधिमंडळात आलेच नाहीत. ते आजारी आहेत. परंतु, त्यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे अन्य कोणाकडेही दिलेली नाहीत. याच मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी महाविकास आघाडी सरकारला चिमटा काढला. निदान अधिवेशन काळात तरी सरकारची सूत्रे अजितदादांकडे द्या. ते चांगला कारभार करतात. वेगवेगळे विषय त्यांच्यामुळे अधिवेशनात मार्गी लागले. आमदारांनी आपापली मते मांडली. भले पाच दिवसांचे अधिवेशन असेल पण अजितदादांच्या नेतृत्वाखाली चांगले काम झाले, अशी स्तुतिसुमने मुनगंटीवार यांनी उधळली.
त्याच वेळी अधिवेशन काळापुरती सरकारची सूत्रे अजितदादांकडे द्या. इतर वेळेला सरकारची सूत्रे बाबांकडे म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राहू द्या, असे ते पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना उद्देशून म्हणाले. एकूण मुनगंटीवार यांच्या मुखातून भाजपचे राष्ट्रवादीवरचे प्रेम उफाळून आले होते. दुपारी अजितदादांचे भाजपवरचे प्रेम विधानसभेत दिसले. सायंकाळी त्याची परतफेड सुधीर मुनगंटीवार यांनी केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App