पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी समजूत काढल्यावर आंदोलनकर्त्याने आंदोलन मागे घेतले.Aurangabad: MLA Atul Save’s MLA post should be canceled ; The youth climbed the tower and started agitation
विशेष प्रतिनिधी
औरंगाबाद : आमदार अतुल सावे यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करुन त्यांची आमदारकी रद्द करावी, या मागणीसाठी एकाने टाॅवर चढून तीन तासांपेक्षा अधिक वेळ आंदोलन केले.आंदोलकाचे नाव संभाजी भोसले असे आहे.आज मंगळवारी (ता.२८) औरंगाबाद तहसिल कार्यालयाजवळ ही घटना घडली.पोलिस आयुक्त निखिल गुप्ता यांनी समजूत काढल्यावर आंदोलनकर्त्याने आंदोलन मागे घेतले.
संभाजी भोसले म्हणाले, की सर्वसामान्यांच्या वतीने विधानसभा अध्यक्ष यांना सावे यांच्याविरुद्ध पुरावे पाठविले आहे. त्यांना निलंबित करावे. पुरावे सिद्ध झाल्यास आमदार अतुल सावे यांची आमदारकी रद्द करावी, अशी मागणी संभाजी भोसले यांनी केली आहे.
संभाजी भोसले म्हणाले की, माझ्याविरुद्ध सिटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.मी गुन्हेगार नाही. सोळाशे दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत मी आंदोलन करतो आहे. तरी त्यांच्यावर (आमदार सावेंवर) गुन्हा दाखल झालेला नाही.माझी मागणी पूर्ण झाली नाही तर आता हे तर ट्रेलर आहे, पुढे काय होईल ते पाहा, अशा इशारा संभाजी भोसले यांनी दिला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App