पाकिस्तानमधील हिंदू मुलींना चीनमध्ये दासी म्हणून विकले जातेय

पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले जात आहेत. हिंदू मुलींना चीनमध्ये दासी म्हणून विकले जात असल्याचा आरोप अमेरिकन मुत्सद्दी सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी केला आहे. Hindu girls in Pakistan are sold as slaves in China


वृत्तसंस्था

न्यूयॉर्क : पाकिस्तानात अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंवर प्रचंड अत्याचार केले जात आहेत. हिंदू मुलींना चीनमध्ये दासी म्हणून विकले जात आहे, असा आरोप अमेरिकन मुत्सद्दी सॅम्युअल ब्राऊनबॅक यांनी केला आहे. Hindu girls in Pakistan are sold as slaves in China

प्रशासनात धार्मिक स्वातंत्र्य विभागात वरिष्ठ अधिकारी असलेल्या सॅम्युअल यांनी म्हटले आहे की, अल्पसंख्यक समुदायातील स्त्रियांना चिनी लोकांशी लग्न करण्यास भाग पाडले जाते. त्यांना चीनमध्ये दासी म्हणून सादर केले जाते आणि त्यांचे मार्केटिंग केली जाते. या मुलींवर चीनमध्ये वेठबिगार म्हणून काम करण्याची वेळ येते. Hindu girls in Pakistan are sold as slaves in China

अमेरिकेने अलीकडेच 10 देशांची यादी जाहीर केली ज्यांना धार्मिक स्वातंत्र्य नाही. पाकिस्तानव्यतिरिक्त चीनचा देखील या यादीत समावेश आहे. चीनमध्ये उईगर मुस्लिमांचे प्रकरण बऱ्याच काळापासून चालू आहे. चीनमध्ये अनेक दशके एक मूल धोरण आहे. येथे महिलांची कमतरता आहे आणि म्हणूनच चिनी पुरुष इतर देशांतील महिलांशी लग्न करतात. त्यांना दासी म्हणूनही वापरले जाते.

Hindu girls in Pakistan are sold as slaves in China

यूएस कमिशन फॉर इंटरनॅशनल रिलिजियस फ्रीडम यांनीही भारताला या यादीत समाविष्ट करण्याचे सुचवले होते. याचे कारण भारताचे अलीकडील नागरिकत्व सुधार अधिनियम (सीएए) असे सांगितले गेले आहे. मात्र, परराष्ट्र मंत्री माईक पोम्पीओ यांनी ही मागणी फेटाळून लावली. सॅमुअल म्हणाले-आम्ही भारतातील परिस्थितीवरही नजर ठेवत आहोत.

पाकव्याप्त काश्मिरात नागरिक रस्त्यावर, इम्रान खान यांच्याविरोधात संताप

एका पाकिस्तानी रिपोर्टरने सॅमुअलला विचारले की- पाकिस्तानला तुम्ही या लिस्टमध्ये ठेवले आहे, भारताला नाही. असे का? यावर ते म्हणाले- पाकिस्तानमधील सरकार अल्पसंख्याकांच्या विरोधात काम करते. भारतात असे होत नाही. जगात ईश निंदेचे जेवढे प्रकरण समोर येते, त्यामधील अर्धे प्रकार एकट्या पाकिस्तानात घडले आहेत.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात