पुढील सुनावणीपर्यंत मराठा तरुणांचे भवितव्य काय?; संभाजीराजे यांचा ठाकरे – पवार सरकारला सवाल

  • मराठा आरक्षणाची स्थगिती उठवण्यास सर्वोच्च न्यायालयाकडून नकार

वृत्तसंस्था

मुंबई : राज्य सरकारने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी घेण्याची मागणी केली होती. या याचिकेवर आज सुनावणी झाली. मात्र, पाच सदस्यीय घटनापीठाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिला.

त्यामुळे राज्य सरकारच्या पदरी पुन्हा एकदा निराशा पडली आहे. जानेवारी महिन्यात या याचिकेवर सुनावणी होणार आहे. मात्र, आजच्या निर्णयावरून छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी काही प्रश्न उपस्थित करत राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली आहे. Sambhaji raje asks explanation from Thackeray – pawar government

सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणावरील स्थगिती उठवण्यास नकार दिल्यानंतर छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी माध्यमांशी बोलताना भूमिका मांडली. “माझी सरकारला विनंती आहे, मुलांचे फार नुकसान होते आहे. मुलांमध्ये आक्रोश निर्माण होतोय. त्यांना पुढे काय करायचे ते कळत नाही. Sambhaji raje asks explanation from Thackeray – pawar government

तोपर्यंत इतर माध्यमातून त्यांना कशी मदत करता येईल. हे सरकारने युद्धपातळीवर निर्णय घ्यावा. मराठा समाजाच्या लढाईपेक्षा हा न्यायप्रविष्ट विषय आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम निर्णय होईल किंवा अंतिम सुनावणी होऊन निर्णय येईल,” असे संभाजीराजे म्हणाले.

Sambhaji raje asks explanation from Thackeray – pawar government

संभाजीराजे म्हणाले, “रोहटगी आणि इतरांनी आपली बाजू चांगली मांडली नाही, असं मी म्हणणार नाही. रोहटगींसह सर्व सहकाऱ्यांनी जोमाने बाजू मांडली. पण बाजू मांडत असताना पुढची तारीख का मागितली हा प्रश्न माझ्यासारख्या सामान्य माणसाला समजला नाही.

मराठा आरक्षणामुळे रखडलेल्या प्रवेशांसाठी लवकरच अध्यादेश, अजित पवारांची माहिती

पुढची तयारी करायची म्हणून पुढची तारीख मागितली का? दुसऱ्या कुठल्या विषयासाठी मागितली हे मला काही कळालं नाही. पण तोपर्यंत सरकार या मुलांसाठी काय करणार हे स्पष्ट करावे.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात