आयकर विभागाने ही छापेमारी नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी केली आहे.Income tax department raids in North Maharashtra; Assets worth Rs 240 crore confiscated
विशेष प्रतिनिधी
नाशिक : मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रासह संपूर्ण देशात भ्रष्टाचारची अनेक प्रकरणं समोर आली आहेत. आयटी आणि ईडीने टाकलेल्या छाप्यात अनेक मोठ मोठे व्यावसायिक तसेच अधिकारी सापडले आहेत.दरम्यान उत्तर महाराष्ट्रात नुकतीच आयकर विभागाने छापेमारी केली आहे.
आयकर विभागाने ही छापेमारी नाशिकसह धुळे आणि नंदुरबारमध्ये विविध ठिकाणी केली आहे.या छापेमारीत कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आयटीच्या जाळ्यात सापडली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसात आयकर विभागाने तब्बल ३१ ठिकाणी छापेमारी केली आहे. आयकर विभागाच्या छाप्यात संबंधित तीन जिल्ह्यातून २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.यामध्ये ६ कोटींच्या रोकडसह ५ कोटींचे मौल्यवान दागिने देखील जप्त केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App