विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिवसेनेसाठी मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) मृत्यूचा सापळा रचला आहे, अशा शब्दांत भारतीय जनता पक्षाचे नेते आमदार नितेश राणे यांनी विधानपरिषद निकालांवरुन शिवसेनेवर टीका केली आहे. shivsena latest news
नितेश राणे म्हणाले, ठीक आहे आम्ही कमी पडलो! पण ज्या पक्षाचा (शिवसेना) मुख्यमंत्री आहे. त्यांनाच या निवडणुकीत भोपळा मिळाला. मित्र पक्षानीच (काँग्रेस आणि राष्ट्रवादी) शिवसेनेसाठी मृत्यूचा सापळा रचला आहे, अशी टीका केली आहे. ‘बाकी मैदानात परत भेटूच !!’, असे आव्हान देखील दिलं आहे. shivsena latest news
राणे यांनी असे म्हटले आहे याचे कारण म्हणजे महाविकास आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांचा पराभव करून अपक्ष किरण सरनाईक यांनी बाजी मारली. विजयी उमेदवार किरण सरनाईक हे काँग्रेसच्या माजी आमदार मालतीबाई सरनाईक यांचे ते पुत्र आहेत. विशेष म्हणजे मागील ५० वर्षांपासून सरनाईक घराणं हे काँग्रेस पक्षाच्या सोबत होतं.
अमरावती विभागातील संस्था चालक मंडळाचे ते विभागीय अध्यक्षही राहिले आहेत. वाशीममधल्या श्री शिवाजी संस्थेचंही अध्यक्षपदही त्यांनी भूषवले होते. अकोला जिल्ह्यात युवक काँग्रेसचे माजी अध्यक्षही होते. विद्यार्थी संघाचे ते माजी अध्यक्षही राहिले आहेत.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही यावरून शिवसेनेवर टीका केली आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत झालेल्या निवडणुकीत शिवसेनेला एकही जागा जिंकता आली नाही. शिवसेनेनं परभवाचं आत्मपरिक्षण करावे, असा सल्ला देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. भाजपनं किमान एक जागा राखली.
पण, शिवसेनेनेला भोपळाही फोडता आला नाही. शिवसेनेच्या हाती काहीही लागलं नाही. या निवडणुकीचा महाविकास आघाडीतील केवळ दोनच पक्षांना फायदा झाला. एका पक्षाला तर एकही जागा मिळाली. ज्या पक्षाचा राज्यात मुख्यमंत्री आहे त्याच पक्षाला अर्थात शिवसेनेला एकही जागा मिळाली नाही, ही बाब गंभीर असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App