विज्ञानाची गुपिते : कशी पडली असतील इंग्रजी तसेच मराठी महिन्यांची नावे

इंग्रजी महिन्यांच्या नावांचा खगोलशास्त्राशी काही एक संबंध नाही. त्यातील काही व्यक्तिनिष्ठ तर काही आकड्यांवरून केली आहेत. उदाहरणार्थ जुलै हे नाव जुलिअस सीझरवरून, ऑगस्ट नाव सम्राट ऑगस्टसवरून ठेवले आहे. त्या काळी जानेवारी आणि फेब्रुवारी हे महिने वर्षाच्या शेवटी होते. त्यामुळे सप्टेंबर महिना सातवा होता. ते नाव हेच दर्शवते. याचप्रमाणे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर नावे ठेवलेली आहेत. अशा प्रकारे इंग्रजी महिन्यांच्या नावांचा खगोलशास्त्राशी कहीही संबंध नाही.How the names of English and Marathi months may have fallen

मराठी महिन्यांच्या नावांचा मात्र खगोलशास्त्राशी घनिष्ठ संबंध आहे. एखाद्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र ज्या नक्षत्रात असतो, त्या नक्षत्रावरून तो महिना ओळखला जातो. उदाहरणार्थ ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र चित्रा नक्षत्रात असतो, तो चैत्र महिना. ज्या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र विशाखा नक्षत्रात असतो, तो वैशाख महिना. यावरून अजून एक गोष्ट लक्षात येते. पौर्णिमेला चंद्र आणि सूर्य हे एकमेकांच्या विरुद्ध बाजूला असतात. आणि चंद्र चित्रा नक्षत्रात असतो,

त्यामुळे चंद्र आणि चित्रा एकत्र उगवतात. म्हणजेच चित्रा नक्षत्र व पर्यायाने कन्या रास सारी रात्र आकाशात दिसेल. पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात ते झाकोळून जाईल पण त्या महिन्याच्या इतर दिवशी ते नक्षत्र व रास रात्रभर आकाशात दिसेल. कारण चंद्राची गती जास्त असल्यामुळे चंद्र पुढे निघून जाईल व त्याचे बिंबही लहान असेल. म्हणजेच ज्या नक्षत्रावरून महिना ओळखला जातो ते नक्षत्र सारी रात्र आकाशात आपल्याला पाहता येईल. एका राशीत सूर्य साधारणपणे एक महिना असतो.

म्हणजेच ही स्थिती एक महिना टिकेल. म्हणजेच चैत्र महिन्यात कन्या रास रात्रभर आकाशात दिसेल. प्रत्येक रास ३० अंशांची असते. पृथ्वी २४ तासात ३६० अंशांतून फिरते. याचा अर्थ एका राशीएवढे अंतर फिरायला तिला दोन तास लागतात. यावरून आपण पौर्णिमेच्या रात्रीचा अंदाज काढू शकतो. चैत्री पौर्णिमेस कन्या रास चंद्राबरोबर उगवल्यानंतर दोन तासांनी पुढची म्हणजेच तूळ रास उगवेल. त्यानंतर दोन तासांनी वृश्चिक रास उगवेल. पुढच्या म्हणजे वैशाख महिन्यात चंद्राबरोबर तूळ रास उगवेल. अशाप्रकारे आपण केवळ महिन्यांच्या नावांवरून आकाशात काय दिसेल याचा थोडाफार अंदाज करू शकतो.

How the names of English and Marathi months may have fallen

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात