हिंदू देवदेवतांविषयी केलेल्या विधानाबाबत जितनराम मांझी यांनी मागितली माफी

विशेष प्रतिनिधी

पाटणा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि सत्ताधारी रालोआचे नेते जितनराम मांझी यांनी ब्राह्मण तसेच हिंदू देव देवतांविषयी केलेल्या विधानांमुळे राज्यात वाद निर्माण झाला आहे. आपण चुकून जे काही बोललो, त्याविषयी खेद व्यक्त करतो, असे मांझी यांनी जाहीर केले आहे.Jitendra Manjhi apologized for his statement about Hindu deities

सत्यनारायण व अन्य पूजेसाठी मागास जातींच्या घरी ब्राह्मण पंडित जातात. पण त्यांच्या घरी खात नाहीत, पैसे मात्र घेतात, असे विधान मांझी यांनी केले होते. त्यांनी हिंदू देवदेवतांविषयीही काही विधाने केली होती. त्यामुळे रालोआमधील भाजप नेते संतप्त झाले. त्यानंतर मांझी यांनी खेद व्यक्त केला.



त्यानंतर आपण ब्राह्मणांच्या नव्हे, तर दलितांविषयी द्वेष बाळगणाऱ्या ब्राह्मणवादाच्या विरोधात आहोत. ब्राह्मणवाद दलितांना अस्पूश्य मानतो, त्यांच्या कमरेला झाडू, गळ्यात हाडांची माळ व पायात घुंगरू बांधायला लावतो. हे आजही सुरू असून, आपण या ब्राह्मणी प्रवृत्तीविरुद्ध लढत राहू, असे त्यांनी जाहीर केले. त्यांच्या या विधानांचे प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रीय जनता दलाने स्वागत केले आहे.

जितनराम मांझी बिहारचे मुख्यमंत्री असताना त्यांना मंदिरात येण्यापासून रोखण्यात आले होते, याचा उल्लेख राजदचे नेते व माजी विधानसभाध्यक्ष उदय नारायण चौधरी यांनी केला. मागास जातीच्या लोकांनी पैसा ब्राह्मण भटजींना चालतो, मग खाद्यपदार्थ का चालत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.

Jitendra Manjhi apologized for his statement about Hindu deities

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात