विशेष प्रतिनिधी
मुंबई : शाहीनबागप्रमाणे सध्या सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाचीही पोलखोल होईल आणि या आंदोलनाला पाठिंबा देणाऱ्यांचे तोंड काळे होईल, असे प्रसिध्द अभिनेत्री कंगना रनौटने म्हटले आहे.
शेतकरी आंदोलनावर केलेल्या भाष्यावरून टीका करणाऱ्यांना उत्तर देताना कंगना म्हणाली, गिधाढांनो, माझ्या शांत बसण्याला कमजोरी समजू नका. तुम्ही खोटेनाटे बोलून निष्पाप लोकांना कशा पध्दतीने फसवत आहात, हे मी पाहत आहे. त्यांचा वापर केला जात आहे. मात्र, शाहीन बाग आंदोलनाचे सत्य ज्या प्रमाणे उघड झाले तसेच या आंदोलनाचेही वास्तव उघड होणार आहे. त्यावेळी मी एक शानदार भाषण लिहून सगळ्यांचे तोंड काळे करणार आहे.
शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या महिंदर कौर या महिलेचा फोटो शेअर करून शाहीन बाग आंदोलनातील दादी असल्याचे म्हटले होते. यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दिलजीत दोसांझ याने कंगनाला सुनावले होते. महिंदर कौर यांचा आदर ठेव. पुराव्याशिवाय काहीही बोलू नकोस. माणसाने इतकेही अंध असू नये. काहीही बोलते, असे म्हटले होते.
याला उत्तर देताना कंगना म्हणाली, करण जोहरच्या पालतू कुत्र्या. ज्या दादी शाहीन बाग आंदोलनात दिसल्या होत्या त्याच शेतकरी आंदोलानतही होत्या. मी महिंदर कौर यांना ओळखतही नाही. त्यामुळे तुम्ही लोकांनी चालविलेली ही नाटके बंद करा.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App