विशेष प्रतिनिधी
गुरुदासपूर : पंजाबमधील गुरुदासपूरमध्ये घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा प्रयत्न होता. भारतीय सुरक्षा दलांनी हा प्रयत्न हाणून पाडला आहे. सध्या पंजाबमध्ये पाकिस्तानी दहशतवादी प्रचंड सक्रिय होत असल्याचे दिसत आहेत. अशा स्थितीमध्ये गुरुदासपूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न असफल झाल्याने थोडीशी उसंत मिळाली आहे. मंगळवारी सकाळी पावणेसात वाजता सीमा सुरक्षा दलाने कारवाई करून ह्या घुसखोर पाकिस्तानीला ठार मारले आहे.
Pakistani infiltrators got killed at Punjab border by BSF
गुरूदासपूरमधील बसंत नाल्याजवळ ही घटना घडली. काही महिन्यांपासून पाकिस्तान आपल्या नापाक कारवायांना आवर घालत नाहीये असे लक्षात येताच काश्मीरशिवाय पाकिस्तान कडून पंजाबच्या सीमा रेषेवरदेखील हालचाली वाढल्या होत्या. पाकिस्तानकडून होणारे ड्रोन हल्ल्यांमध्ये देखील वाढ झालेली आहे.
Jammu Kashmir : दहशतवाद्यांनी अपनी पार्टीच्या गुलाम हसन लोन यांच्यावर गोळ्या झाडल्या, या वर्षात भाजपच्या पाच नेत्यांची हत्या
ह्या रविवारी रात्रीही पाकिस्तानमधील ड्रोन भारतीय हद्दीत घुसण्याचा प्रयत्न करत होते. मात्र भारतीय सुरक्षा दलांनी त्यांच्यावर गोळीबार करून त्यांना परतवून लावले हाेते. ही घटना ताजी असतानाच आज गुरुदासपूरमध्ये ही घुसखोरीची घटना घडली आहे.
बीएसएफ जवानांनी सांगितलेल्या माहितीनुसार, गुरुदासपूर सेक्टरमध्ये भारत पाक सीमेवर आज सकाळी साडेसहा वाजता एका पाकिस्तानी घुसखोर भारतीय सरहद्दीत घुसला होता. त्याचवेळी सीमा सुरक्षा दलाने त्याला ठार केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App