पश्चिम बंगालमधील एक कोटी घरांपर्यंत भाजप पोहोचविणार ममता सरकारचा भ्रष्टाचार

पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष एक कोटी परिवारांपर्यंत ममता बॅनर्जी सरकारचा भ्रष्टाचार पोहोचविणार आहे. यासाठी पक्षाने खास कार्यक्रम जाहीर केला आहे. तब्बल एक कोटी परिवारांपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. west bengal bjp latest news


विशेष प्रतिनिधी

कोलकत्ता : पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्ष एक कोटी परिवारांपर्यंत ममता बॅनर्जी सरकारचा भ्रष्टाचार पोहोचविणार आहे. यासाठी पक्षाने खास कार्यक्रम जाहीर केला आहे. तब्बल एक कोटी परिवारांपर्यंत भाजपाचे कार्यकर्ते पोहोचणार आहेत. west bengal bjp latest news

पश्चिम बंगाल भाजपाचा अध्यक्ष दिलीप घोष यांनी दिलेल्या माहितीनुसार तृणमूल कॉंग्रेस सरकार ‘दुआरे सरकार’ कार्यक्रम चालविणार आहेत. मात्र, या सरकारचा खरा चेहरा उघड करण्यासाठी ५ डिसेंबर रोजी भारतीय जनता पक्ष आता ‘आर नोय अन्याय’ (आता आणखी अन्याय नाही) असा कार्यक्रम राबविणार आहे. यामध्ये ममता बॅनर्जी सरकारच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे उघड होणार आहेत.

भाजपाचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन याबाबत लोकांना माहिती देतील. पत्रकांचे वितरण करतील. त्याचबरोबर ममता बॅनर्जी यांच्या हटवादीपणामुळे गरीबांपर्यंत केंद्र सरकारच्या योजना पोहोचत नसल्याने त्यांचे होणारे नुकसान सांगतील. पश्चिम बंगालमध्ये शेतकरी सन्मान योजना, आयुष्यमान रोजगार योजना यासारख्या केंद्राच्या कल्याणकारी कार्यक्रमांवरही ममता बॅनर्जी यांनी बंदी घातली आहे. त्यामुळे त्याचा लाभ लोकांना मिळत नाही.

west bengal bjp latest news

यापूर्वी जून-जुलैमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एक कोटी परिवारांपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पत्र पाहोचविले होते. यामध्ये भाजप सरकारने केंद्रात केलेल्या कामांची माहिती दिली होती.

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात