विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : हरियाणातील शेतकरी आंदोलनात शाहीनबागेच्या महिला, जेएनयूचे आणि दिल्ली युनिव्हसिटीचे विद्यार्थी घुसल्याची कबुली खुद्द आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनीच दिली आहे. ही कबुली देऊन ते थांबले नाहीत. तर त्यांनी शेतकऱ्यांचे खऱ्या शेतीविषयक कारणांसाठी सुरू असलेले हे आंदोलन शाहीनबागी महिला आणि जेएनयूचे विद्यार्थी भरकटून टाकतील, अशी चिंताही व्यक्त केली आहे. farmer agitation
शेतकऱ्यांचे हरियाणातील कुंडली सीमेवर आंदोलन सुरूच होते. आतापर्यंत शेत करी आंदोलनाला १०० हून जास्त संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यात अनेक इतर क्षेत्रांतील संघटनांचाही समावेश आहे. आंदोलनस्थळी अशा संघटनांचे पदाधिकारी आणि इतर लोकांची गर्दीही वाढली आहे. त्यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नाही. हे लोक या मुद्द्यावर अनेक वादग्रस्त वक्तव्ये करताना आढळली आहेत. त्यावर शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. farmer agitation
पतियाळाचा तरुण शेतकरी नेता सतिंदर म्हणाला, काही चुकीचे आणि खोडसाळ लोकही आंदोलनात सहभागी झाले आहेत. त्यांचे वर्तन योग्य नाही. त्यांनी काही चूका केल्यास आम्हा शेतकऱ्यांना माफी मागावी लागते. बाहेरच्या लोकांमुळे आंदोलन व्यर्थ जाण्याची भीती वाटते.
शेतकरी नेते बलदेव सिंह म्हणाले, आम्ही बाहेरील लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आणि त्यांना बाहेर घालवून देण्यासाठी तरुणांची फळी तयार केली आहे. येथे मंच तयार होताच गर्दी होते. ही गर्दी रात्रीच्या वेळी येते. शाहीनबागच्या महिलांपासून जेएनयू, डीयूपर्यंतच्या विद्यार्थ्यांची टीमही येथे येत आहे. दै. भास्करने हरियाणातील परिस्थितीतचा आढावा घेणारी ही बातमी दिली आहे.
अखिल भारतीय शेतकरी समन्वय समिती, मासेमारी संघ महाराष्ट्र, मेधा पाटकर यांच्या संघटनेपासून सीटू, एआयकेएस, खापपर्यंत सर्व संघटनांनी पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय केरळ, ओडिशा, मध्य प्रदेशचे शेतकरी नेतेही आले आहेत. पंजाबचे शेतकरी नेते सतनामसिंह बेहरू म्हणाले, आम्ही राजकीय लोकांना मंचावर येण्याचे आवाहन केले आहे.
गॅस सिलिंडर सांभाळा; मंचावरून इशारा
पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत गॅस सिलिंडर ठेवलेले आहेत. लंगर सेवा देणारे दिल्ली, हरियाणा, पंजाबच्या गुरुद्वाऱ्याचे गॅस सिलिंडरही आंदोलनस्थळी आलेले आहेत. त्यामुळे सिलिंडरची संख्या हजारोंच्या घरात आहे. म्हणूनच रोज सायंकाळी शेतकऱ्यांना मंचावरून सिलिंडरबद्दल इशारा दिला जातो. शेतकरी रात्री वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये त्यावर निगराणी ठेवत आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App