भारतासोबत प्रत्यक्ष ताबा रेषेवर कुरापती काढणाऱ्या चीनने तांदळासाठी भारताकडेच हात पसरले आहे. थायलंड, व्हिएतनाम, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान या देशांकडून चीन दरवर्षी तांदूळ आयात करत असतो. यंदा मात्र या सर्व देशांनी त्यांच्याकडील उत्पादन कमी झाल्याने चीनला तांदूळ निर्यात करण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे चीन भारताकडून तांदूळ खरेदी करणार आहे. china for rice
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतासोबत प्रत्यक्ष ताबा रेषेवर कुरापती काढणाऱ्या चीनने तांदळासाठी भारताकडेच हात पसरले आहे. थायलंड, व्हिएतनाम, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान या देशांकडून चीन दरवर्षी तांदूळ आयात करत असतो. यंदा मात्र या सर्व देशांनी आपल्याकडील उत्पादन कमी झाल्याने चीनला तांदूळ निर्यात करण्यात असमर्थता दर्शवली. त्यामुळे चीन भारताकडून तांदूळ खरेदी करणार आहे. china for rice
यापूर्वी गुणवत्तेचे कारण पुढे करत चीन भारतीय तांदूळ नाकारत होते. चीन दरवर्षी चाळीस लाख टन तांदळाची आयात करतो. थायलंड, व्हिएतनाम, ब्रह्मदेश आणि पाकिस्तान या देशांकडून चीन दरवर्षी तांदूळ आयात करत असतो. यंदा मात्र या सर्व देशांनी आपल्याकडील उत्पादन कमी झाल्याने चीनला तांदूळ निर्यात करण्यात असमर्थता दर्शवली. china for rice
त्यामुळे दरवेळी गुणवत्तेचे कारण सांगत भारतीय तांदळाला नाकारणाऱ्या चीनला भारताकडून तांदूळ आयात करावा लागत आहे. ३०० डॉलर प्रतिटन या दराने भारताने चीनला तांदूळ निर्यात करण्याचे ठरवले आहे. इतर देशांच्या तुलनेत ३० डॉलरने हा दर कमी आहे.
चीनने प्रथमच भारतीय तांदळाची मागणी केली आहे. तांदळाची गुणवत्ता पाहून नजीकच्या भविष्यात चीन आयात वाढवू शकतो, असा आशावाद भारतीय तांदूळ निर्यात संघटनेचे अध्यक्ष बी.व्ही. कृष्णराव यांनी व्यक्त केला आहे. डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत चीनला भारतीय तुकडा तांदूळ निर्यात केला जाणार असल्याचे कृष्णराव यांनी सांगितले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App