जेव्हा आपण आंदोलनाचे फोटो पाहतो तेव्हा त्यात बहुतेक जण शेतकरी दिसून येत नाहीत. अतिशय कमी शेतकरी या आंदोलनात आहेत. जे शेतकऱ्यांच्या हिताचे तेच सरकारने केले आहे, असे केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे. farmer agitation news
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : जेव्हा आपण आंदोलनाचे फोटो पाहतो तेव्हा त्यात बहुतेक जण शेतकरी दिसून येत नाहीत. अतिशय कमी शेतकरी या आंदोलनात आहेत. जे शेतकऱ्यांच्या हिताचे तेच सरकारने केले आहे, अशी टीका केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांनी केली आहे. farmer agitation news
माजी लष्करप्रमुख असलेल्या व्ही. के. सिंह यांनी म्हटले आहे की, स्वामीनाथन समितीच्या अहवालातही शिफारस करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आपले उत्पादन विकण्याचे स्वातंत्र्य मिळावं. शेतकऱ्यांवर कुठलीही बंधनं असू नये, अशी मागणी वेळोवेळी केली गेली. आपलं उत्पादन बाजारात विकायचं असेल तर ते विका आणि तुम्हाला जर बाहेर विकायचं असेल तर तेही विकू शकतात, हे काम सरकारने केलं आहे. या आंदोलनामागे विरोधी पक्षासह कमिशन खाणाऱ्यांचा हात आहे.
दरम्यान, दिल्लीचा पाणीपुरवठा थांबवू, दिल्लीचे रस्ते बंद करू, दिल्लीला घेराव घालून बसू. असं म्हणणं योग्य नाही. ही लाहोर-कराची नाही, ही देशाची राजधानी आहे, असे हरयाणाचे कृषिमंत्री जे. पी. दलाल यांनी सुनावले आहे. जे. पी. दलाल यांनी सर्व शेतकरी बांधवांंनी सदबुद्धीने विचार करावा. चर्चा करावी, असे आवाहन केले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App