विशेष प्रतिनिधी
हैद्राबाद : अभय डांगे आणि सुप्रियो चक्रबर्ती या गे कपलने आपन लग्न करणार आहोत हे ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते. या दोघांनी आपले नाते पब्लिकली सांगितल्यानंतर या लोकांना बरेच ट्रोल करण्यात आले होते. जेव्हा की भारतात सेम सेक्स मॅरेज आता कायदेशीररित्या मंजूर करण्यात आले आहे. तरीदेखील लोकांची मनोवृत्ती काही बदलत नाही.
Gay Marriage: The first gay marriage in Telangana happened in Hyderabad
मात्र अभिनेत्री समांथाने जेव्हा या दोघांचे ट्विट रिट्विट करत या दोघांना शुभेच्छा दिल्या होत्या, तेव्हा मात्र बऱ्याच लोकांनी या दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. 18 डिसेंबर रोजी या दोघांचे हैदराबादमध्ये लग्न पार पडले आहे. दोघांनी एकमेकांसोबत आयुष्य काढण्याची वचने एकमेकाला दिली आहेत.
‘ LGBTQ समुदाय भीतीने लपला ‘, अफगाण समलिंगी कार्यकर्त्याने तालिबानी राजवटीबद्दल व्यक्त केली चिंता
या दोघांच्या लग्नाला एकूण 60 लोक उपस्थित होते. जवळचे मित्र, मैत्रिणी आणि घरचे यांच्या उपस्थितीमध्ये या दोघांनी लग्न केले आहे. आणि तेलंगणामधील हे पहिले गे मॅरेज आहे. सुप्रियो हा 31 वर्षांचा आहे तर अभय हा 34 वर्षांचा आहे.
सुप्रियोने 2021 च्या व्हॅलेंटाईन डे दिवशी द न्यू इंडियन एक्स्प्रेस या वृत्तवाहिनीवर आपले नाते सर्वात प्रथम मान्य केले होते. सुप्रियो च्या म्हणण्यानुसार, दोन लोकांमध्ये जेव्हा आदर असतो, सन्मान असतो, प्रेम असते तेव्हा कोणतेही नाते कॉम्प्रमाईज करण्याची अजिबात आवश्यकता नसते.
या दोघांच्या लग्नानंतर बऱ्याच गे कपल्सना किंवा लेस्बियन कपल्सना आपले नाते सार्वजनिक करण्याची हिंमत निश्चित मिळाली असणारे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App