प्रतिनिधी
पुणे : महाराष्ट्र दौऱ्यात राजकीय भाष्य करायला आलेलो नाही, असे केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी म्हटले असले तरी या दौऱ्याच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी महाराष्ट्रातले सर्वात महत्वाचे आणि मोठे राज्याचे भाष्य केलेच. त्यांनी बऱ्याच दिवसांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव घेऊन त्यांना राजीनामा देऊन मैदानात घेण्याचे आव्हान दिले. If you have courage you should resign amit shah to cm uddhav thackeray
पुणे ही लोकमान्य टिळकांची नगरी आहे. लोकमान्यांनी स्वराज्य माझा जन्म सिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच अशी गर्जना केली होती. मात्र, शिवसेना सत्ता हा माझा अधिकार आहे आणि कोणत्याही प्रकारे मिळवणार असे म्हणत आहे, अशी टीका करतानाच हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि मैदानात या. आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत, असे खुले आव्हानच अमित शहा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.
अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत अडीच अडीच वर्षे सत्ता वाटपाचे आश्वासन दिले होते. परंतु ते त्यांनी पाळले नाही, असा आरोप करत उद्धव ठाकरे यांनी भाजपची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्याशी नवा घरोबा मांडून मुख्यमंत्रीपद मिळवले आहे. याच संदर्भात अमित शहा यांनी पुण्यात भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांना राजीनामा देऊन मैदानात या आम्ही तुमच्याशी दोन हात करायला तयार आहोत असे आव्हान दिले आहे. या आव्हनानंतर आता शिवसेनेच्या कडून नेमके अमित शहा यांना कोण आणि कसे उत्तर देते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
परंतु अमित शहा यांचे उद्धव ठाकरे यांना थेट आव्हान असल्यामुळे शिवसेना देखील तितक्याच जोरकसपणे प्रतिआव्हान देणार हे उघड आहे. काल अहमदनगर जिल्ह्यात अमित शहा यांनी वळणावळणाने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना ठोकून घेतले, पण आज मात्र उघडपणे त्यांनी उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन मैदानात येण्याचे आव्हान दिले. ही अत्यंत महत्त्वाची राजकीय घडामोडी अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात घडली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 18 महापालिकांच्या निवडणुकांचे रणशिंग देखील फुंकले गेले आहे. येत्या दोन तीन महिन्यांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असे मोठे राजकीय घमासान रंगणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App