‘बंगळूरची उन्नती हि शहाजी राजेंमुळेच , याची जाण ठेवावी ‘ ; खासदार संभाजी महाराज यांनी ट्विटद्वारे व्यक्त केला संताप

गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही होत आहे.’The upliftment of Bangalore is due to Shahaji Raje, one should be aware of this’; MP Sambhaji Maharaj expressed his anger through a tweet


विशेष प्रतिनिधी

बंगळूर : बंगळूरमध्ये काही समाजकंटकांनी गुरुवारी रात्री पुतळ्यावर काळा रंग टाकत महाराजांच्या पुतळ्याची विटंबना केली. यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. खरंतर, गेल्या अनेक महिन्यांपासून कर्नाटकात काही संघटना आणि समाजकंटकांकडून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरणे, त्यांच्या पुतळ्याचा अपमान करण्याचा प्रयत्नही होत आहे.



बंगळूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करतानाच बंगळूरची उन्नती शहाजीराजे यांच्यामुळे झाली, याची तरी जाण ठेवा, अशा शब्दात आपला संताप व्यक्त केला आहे.खासदार संभाजी महाराज यांनी ट्विटद्वारे हा संताप व्यक्त केला आहे.

संपूर्ण देशाची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची झालेली विटंबना निषेधार्ह आहे. केंद्र व कर्नाटक सरकारने याची गांभीर्याने दाखल घेऊन तातडीने कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

‘The upliftment of Bangalore is due to Shahaji Raje, one should be aware of this’; MP Sambhaji Maharaj expressed his anger through a tweet

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात