North Koria: धक्कादायक! उत्तर कोरियात ११ दिवस प्रेतयात्रा- वाढदिवस-दारु-हसण्या-रडण्यावरही बंदी ; देशात राष्ट्रीय शोक जाहीर

11 दिवसाच्या कालावधीत कुणाचा मृत्यू झाला तर त्याच्या नातेवाईकाला मोठ्याने रडण्याचीही परवानगी नाही. तसेच नातेवाईक मृतदेहावर अंत्यसंस्कारही 11 दिवसाचा शोक पूर्ण झाल्यानंतर करु शकतात. North Korea bans 11-day funeral, birthday, alcohol, laughter and crying

 


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : उत्तर कोरियाचे माजी नेता किम जोंग इल यांच्या दहाव्या पुण्यतिथीनिमित्त उत्तर कोरिया 11 राष्ट्रीय शोक जाहीर करण्यात आला आहे.  स्वातंत्र्यावर गदा आणण्यात आली आहे.हा विचारही केला तरी अंगावर काटा येतो. मात्र प्रत्यक्षात असा फतवाच काढण्यात आला आहे. 11 दिवस प्रेतयात्रा, वाढदिवस, दारु पिणे, हसण्या-रडण्यासाठी बंदी लावण्यात आली आहे.

तब्बल 11 दिवस हसण्यावर, पिण्यावर आणि खरेदीला जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. किम जोंग-उन यांनी शुक्रवारी त्याचे वडील किम जोंग-इल यांच्या 10 व्या पुण्यतिथीनिमित्त हा आदेश जारी केला. ही बंदी उत्तर कोरियामध्ये घालण्यात आली आहे.

किम यांनी शुक्रवारपासून पुढील 11 दिवस देशात राष्ट्रीय शोक जाहीर केला आहे. त्यामुळे या 11 दिवसांमध्ये तिथल्या लोकांना हसणं, रडणं, प्रेतयात्रा, वाढदिवस काढण्यावर बंदी लावण्यात आली आहे. इतकच नाही तर सामना खरेदी कऱण्यासाठी घराबाहेर जाण्यासही निर्बंध लावण्यात आले आहेत.
किम जोंग यांनी लागू केलेल्या या निर्बंधांना उत्तर कोरियातील लोकांना पालन कऱणं बंधनकारक आहे. जो या निर्बंधांचं उल्लंघन करेल त्याला अटक करून कठोर शिक्षा देण्यात येईल असं फर्मान काढण्यात आलं आहे.

या पूर्वी देखील किम जोंग-इल यांच्या पुण्यतिथीवेळी जे लोक दारू पिऊन येत होते. त्यांना अटक करून शिक्षा दिली जात होती असा दावा तिथल्या एक नागरिकाने केला आहे. ज्या लोकांना अटक केलं त्यांचा नंतर मागमूसही लागला नाही असाही दावा त्याने केला आहे.

दरवर्षी पाळला जातो शोक

सूत्रांच्या माहितीनुसार, आतापर्यंत जे लोक शोक कालावधी दरम्यान मद्यप्राशन करताना किंवा आनंद साजरा करताना आढळले आहेत, त्यांना वैचारिक गुन्हेगार म्हणून अटक करून शिक्षा करण्यात आली आहे. अधिकारी त्यांना घेऊन गेले आणि ते पुन्हा कधीही दिसले नाहीत. उत्तर कोरियामध्ये हा शोक दरवर्षी 10 दिवसांचा असतो. मात्र यावेळी किम जोंग इल यांच्या निधनाला 10 वर्षे पूर्ण झाल्याने यंदा 11 दिवस शोक जाहीर करण्यात आला आहे

North Korea bans 11-day funeral, birthday, alcohol, laughter and crying

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात