वृत्तसंस्था
वॉशिंग्टन : कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारांसाठी तयार केलेली गोळी ‘ओमिक्रॉन’चा संसर्ग झालेल्यांच्या उपचारांवरही प्रभावी ठरते, असा दावा अमेरिकेतील फायझर या औषध उत्पादक कंपनीने केला आहे. या गोळीची दोन हजारांहून अधिक लोकांवर चाचणी घेतली असून या प्रयोगाचा अहवाल समाधानकारक असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Tablet will useful on omricon too
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करताना ‘फायझर’ने तयार केलेल्या गोळीचा वापर केल्यास रुग्णालयात भरती करावे लागण्याची शक्यता कमी होते आणि मृत्यूचा धोकाही ८९ टक्क्यांनी कमी होतो, असा कंपनीचा दावा आहे. ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या नव्या उत्परिवर्तित प्रकाराचा संसर्ग झालेल्यांवर उपचार करतानाही ही गोळी तितकीच प्रभावशाली ठरत असल्याचे ‘फायझर’चे म्हणणे आहे. अमेरिकेत कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून त्या पार्श्वभूमीवर ‘फायझर’च्या दाव्यावर चर्चा होत आहे. या कंपनीने तयार केलेल्या गोळीच्या वापराला अमेरिकेच्या औषध विभागाने अद्याप परवानगी दिलेली नाही.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App