सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते.Pune: Good news for Municipal School students; Money will come directly to the bank account for the purchase of school supplies
विशेष प्रतिनिधी
पुणे : महापालिकेच्या शिक्षण विभागातील विद्यार्थ्यांना’डीबीटी’ योजनेतून त्यांच्या शालेय साहित्य खरेदीसाठी त्यांच्या बॅंक खात्यावर पैसे दिले जाणार आहेत. यास स्थायी समितीने मंगळवारी मान्यता दिली आहे.सन २०१७ पासून लाभांचे हस्तांतरण रोख स्वरुपात थेट लाभार्थ्यांच्या बॅंक खात्यात केले जाते.
या साहित्याचे किमान दरपत्रक ठरवण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यानुसार आवश्यक असणाऱ्या सर्व शालेय साहित्यांच्या किमान दरांना स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
महापालिकेच्या शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, विद्या निकेतन, क्रीडा निकेतन शाळांतील सर्व विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे शैक्षणिक साहित्य पुरविले जाते. गणवेश, पुस्तके, वह्या, दप्तरे, चित्रकला साहित्य, लेखन साहित्य, ट्रॅक सूट, बूट, स्वेटर असे साहित्य या योजनेअंतर्गत दिले जाते.
करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेल्या शैक्षणिक वर्षामध्ये शाळा बंद होत्या. त्यामुळे शालेय साहित्यासाठी आवश्यक असणारा निधी पालकांच्या खात्यावर जमा करण्यात आला नव्हता.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App