शहरात सध्या लोकांना शांतता मिळणेच मुश्कील झाले आहे. सध्याच्या कोलाहलाच्या वातावरणात ऑफिसमध्ये काम करताना तुमच्या शरीरातील रक्ताच्या वाहण्याचा आणि डोळे फिरवल्यानंतर कवटीवर त्याच्या घर्षणाचा आवाज ऐकल्यावर तुमची काय स्थिती होईल.Here also comes the sound of blood flow
मायक्रोसॉफ्ट कंपनीतील एका खास खोलीत गेला तर तुम्हाला याची अनुभूती येते. कंपनीच्या वॉशिंग्टनमधील मुख्यालयात पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली बनविण्यात आली असून, तेथे कंपनीचे सरफेस कॉम्प्युटर्स, एक्सस-बॉक्सि आणि हॉलो लेन्ससारखी उत्पादने विकसित करण्यात येत आहेत. या खोलीत मोजली गेलेली आवाजाची तीव्रता आहे उणे 20.6 डेसिबल.
मनुष्याच्या पुटपुटण्याचा आवाज असतो 30 डेसिबल, तर श्वारसोच्छावासाचा 10 डेसिबल. या खोलीत बाहेरून येणारे आवाज रोखण्यासाठी खोलीला कॉंक्रीटचे सहा थर देण्यात आले आहेत, म्हणजेच एकात एक अशा सहा खोल्या आहेत.
प्रत्येक खोलीच्या भिंतीची जाडी 12 इंच असून, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या आवाजात तब्बल 110 डेसिबलची घट होते. ही खोली 68 कंपने शोषून घेणाऱ्या स्प्रिंगवर उभी असून, ती मुख्य इमारतीला कोठेही थेट स्पर्श करीत नाही. प्रत्येक भिंतीला आवाज शोषून घेणारे चार फुटांचे स्पंजचे तुकडे लावण्यात आले असून, त्यामुळे खोलीतील आवाजाचे प्रतिध्वनी उमटत नाहीत. गिनिज बुकने या खोलीची पृथ्वीवरील सर्वांत शांत खोली म्हणून नुकतीच नोंद केली आहे.
की-बोर्डचा आवाज कमी करण्यासाठीचे विशिष्ट प्लॅस्टिक आणि स्प्रिंगवरही येथे काम सुरू आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि व्हर्च्युअल रिऍलिटीशी संबंधित उपकरणांच्या चाचण्याही येथे घेतल्या जात आहेत. बोयोमेडिकल संशोधनासाठीही रूमचा उपयोग होत असून, स्किझोफ्रेनियावर संशोधन सुरू आहे.
Here also comes the sound of blood flow
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App