omicron infection : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झालेले डॉक्टर बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बंगळुरूत राहणारे हे डॉक्टर भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या दोन प्रकरणांपैकी एक आहेत. त्याचवेळी पोलिसांनी दुसऱ्या रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे जो दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी होता आणि प्रशासनाला न सांगता दुबईला निघून गेला. Bangalore doctor Who recovered after omicron infection Now Found corona positive again, no symptoms so far
वृत्तसंस्था
बंगळुरू : ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन प्रकाराची लागण झालेले डॉक्टर बरे झाल्यानंतर पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. बंगळुरूत राहणारे हे डॉक्टर भारतातील ओमिक्रॉनच्या पहिल्या दोन प्रकरणांपैकी एक आहेत. त्याचवेळी पोलिसांनी दुसऱ्या रुग्णावर गुन्हा दाखल केला आहे जो दक्षिण आफ्रिकेचा रहिवासी होता आणि प्रशासनाला न सांगता दुबईला निघून गेला.
गुजराती वंशाच्या दक्षिण आफ्रिकेतील नागरिकाला संसर्ग झाल्यानंतर विलगीकरणात ठेवण्यात आले होते. त्यानंतर प्रशासनाला न कळवता तो दुबईला पळून गेला. दुसरीकडे, बंगळुरू महानगरपालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ओमिक्रॉनची लागण झालेल्या डॉक्टरला पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह आढळले हे खरे आहे. अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, डॉक्टर विलगीकरणामध्येच आहेत आणि त्यांना आतापर्यंत कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत. डॉक्टरांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. याशिवाय त्यांचा कोणताही प्रवास इतिहास नाही.
क्वारंटाइनचे नियम मोडून दुबईला पळून गेलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या नागरिकाविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एवढेच नाही तर तो ज्या पंचतारांकित हॉटेलमध्ये राहत होता, त्या हॉटेलचे व्यवस्थापन आणि कर्मचाऱ्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आरोग्य अधिकाऱ्यांना न सांगता हॉटेलमधून बाहेर पडू दिल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांवर कर्नाटक महामारी कायद्याच्या विविध तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 नोव्हेंबरला हा व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतून निगेटिव्ह रिपोर्ट घेऊन भारतात पोहोचला. यानंतर बंगळुरू विमानतळावर स्क्रीनिंग आणि चाचणी करण्यात आली. 20 नोव्हेंबर रोजी त्याने हॉटेलमध्ये चेक इन केले. त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर 22 नोव्हेंबरला रुग्णाचा नमुना जिनोम सिक्वेन्सिंगसाठी घेण्यात आला. 23 नोव्हेंबर रोजी एका खासगी लॅबमध्ये रुग्णाची चाचणी करण्यात आली आणि त्याचा अहवाल निगेटिव्ह आला, त्यानंतर रुग्णाने 27 नोव्हेंबर रोजी हॉटेलमधून चेक आउट करून विमानतळावर कॅब घेतली. यानंतर त्यांनी दुबईची फ्लाइट पकडली.
दरम्यान, जगातील 38 देशांमध्ये ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत या आजारामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाल्याचे वृत्त नाही. भारतात आतापर्यंत 20 हून अधिक रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्रात सर्वाधिक 10, राजस्थानमध्ये 9, कर्नाटकात 2, गुजरातमध्ये 1 आणि दिल्लीत 1 रुग्ण आढळून आला आहे.
Bangalore doctor Who recovered after omicron infection Now Found corona positive again, no symptoms so far
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App