Euthanasia : इच्छामृत्यूच्या यंत्राला स्वित्झर्लंडमध्ये कायदेशीर मान्यता, अवघ्या एका मिनिटात वेदनारहित मृत्यू देणाऱ्या यंत्रावर टीकेची झोड

Legalization of euthanasia machine in Switzerland, people started criticizing death machine

euthanasia : स्विस सरकारने इच्छामृत्यू यंत्राला (सुसाइड पॉड) कायदेशीर मान्यता दिली आहे. या यंत्राद्वारे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना न होता शांतपणे मृत्यूला कवटाळता येणार आहे. हे यंत्र बनवणाऱ्या कंपनीने म्हटले की, यंत्रातील ऑक्सिजनची पातळी खूपच कमी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे 1 मिनिटाच्या आत व्यक्तीचा मृत्यू होतो. शवपेटीच्या आकाराच्या या यंत्राचे नाव सारको आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1942 पासून इच्छामृत्यू कायदेशीर आहे. Legalization of euthanasia machine in Switzerland, people started criticizing death machine


वृत्तसंस्था

बर्न : स्विस सरकारने इच्छामृत्यू यंत्राला (सुसाइड पॉड) कायदेशीर मान्यता दिली आहे. या यंत्राद्वारे गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांना वेदना न होता शांतपणे मृत्यूला कवटाळता येणार आहे. हे यंत्र बनवणाऱ्या कंपनीने म्हटले की, यंत्रातील ऑक्सिजनची पातळी खूपच कमी ठेवण्यात आली आहे, ज्यामुळे 1 मिनिटाच्या आत व्यक्तीचा मृत्यू होतो. शवपेटीच्या आकाराच्या या यंत्राचे नाव सारको आहे. स्वित्झर्लंडमध्ये 1942 पासून इच्छामृत्यू कायदेशीर आहे.

तथापि, या यंत्रावर टीकाही सुरू झाली आहे. टीकाकारांचे म्हणणे आहे की, या यंत्रामुळे आत्महत्येस प्रोत्साहन मिळेल जे योग्य नाही. ज्या रुग्णांना आजारपणामुळे हालचाल करता येत नाही, त्यांच्यासाठी हे यंत्र उपयुक्त असल्याचे बोलले जात आहे. यंत्राच्या आत असलेली व्यक्ती पापण्यांची उघडझाप करूनही ते ऑपरेट करू शकते. हे यंत्र एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येते. यात 3D-मुद्रित बायोडिग्रेडेबल कॅप्सूल आहे, ज्याचा वापर शवपेटी म्हणून केला जाऊ शकतो.

एक्झिट इंटरनॅशनल या स्वयंसेवी संस्थेचे संचालक डॉ.फिलीप नित्शके यांनी हे यंत्र बनवण्याचा सल्ला दिला आहे. फिलिप हे डॉ. डेथ म्हणूनही ओळखले जातात. स्वित्झर्लंडमध्ये इच्छामृत्यूसाठी कोणत्याही पद्धतीची मदत घेणे कायदेशीर आहे. गतवर्षी सुमारे 1300 लोकांनी इच्छामरणासाठी विविध संस्थांची मदत घेतली होती. डॉक्टर डेथ म्हणाले – जर काही अडचण नसेल तर पुढील वर्षी हे यंत्र देशात वापरासाठी उपलब्ध होईल. हा आतापर्यंतचा सर्वात खर्चिक प्रकल्प आहे, पण आम्ही तो सुरू करण्याच्या अगदी जवळ आलो आहोत.

Legalization of euthanasia machine in Switzerland, people started criticizing death machine

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात