ऑक्सिजनशिवाय माणूस जगू शकत नाही. पण याचा अर्थ केवळ ऑक्सिजनच माणसाला जिवंत ठेवतो अशातला भाग नाही. अनेकांना याची कल्पना नसते. ऑक्सीजनप्रमाणेच अन्य वायूदेखील तेवढेच मोलाचे असतात. समजा हवेमध्ये केवळ शंभर टक्के ऑक्सिजन असता तर काय परिणाम घडला असता? आपल्याला वाटेल फार छान झाले असते, नाही शास्त्रज्ञांच्या मते असे असते तर आपल्या रोजच्या जगण्यात फार अड़चणी आल्या असत्या.Even just having oxygen on earth is dangerous
चुली मध्ये फुंकणीचा वापर करावा लागला नसता. झाडांना अन्न बनवण्यासाठी कार्बन डायऑक्साइडची फार गरज असते. तो जर मिळाला नाही तर झाडे व पिके सुकून जातील. गाडी चालू करण्यासाठी बटन दाबले तर, तिथेच स्फोट झाला असता. काडी पेटीवर काडी घासून जशी आग लागते तशी तुम्ही भिंतीवर हात घासून आग लावू शकला असता. इतकेच नव्हे तर जेथे जेथे थोडे देखील घर्षण निर्माण झाले असते तेथे आग लागली असती.
ऑक्सिजन वायू हा फ्लोरिननंतर सर्वात इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. म्हणजे त्याचा एक अणू बाकीच्या सर्व अणुंचे दोन इलेक्ट्रॉन स्वतःजवळ खेचून घेतो. या अभिक्रियेत खूप ऊर्जा प्रकाश आणि उष्णतेच्य स्वरूपात सोडली जाते. यालाच आपण आग म्हणतो. थोडक्यात जिथे जिथे आपल्याला आग दिसते तिथे ऑक्सिजन बाकीच्या अणुंकडून इलेक्ट्रॉन खेचून घेत असतो. यालाच तुम्ही आग म्हणता.
त्यामुळे केवळ ऑक्सिजन असते तर अनेक ठिकाणी विनाशच जास्त झाला असता. त्याच्या मदतीला हवेत अन्य अनेक प्रकारच्या वायूचे प्रमाण आहे. त्यामुळेच वातावरणातील सारे संतुलन अबाधित आहे. हे संतुलन काय टिकण्यासाठी औक्सीजनप्रमाणेच कार्न डायऑक्साईड, नायट्रोजन, मिथेन, हेलियम सारखे अन्य वायू देखील तितकेच महत्वाचे कार्य करतात.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App