Corona Omicron Variant : कोरोनाच्या डेल्टा प्रकारानंतर आता अवघ्या जगाने ओमिक्रॉन व्हेरिएंटची धसकी घेतली आहे. आफ्रिकी देशांत आढळलेल्या या व्हेरिएंटने आतापर्यंत 15 देशांमध्ये शिरकाव केला आहे. यामुळे भारतात आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. तथापि, गत 15 दिवसांत आफ्रिकी देशांतून तब्बल 1,000 प्रवासी मुंबईत दाखल झाले, बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी सांगितले की, आतापर्यंत ज्या 466 प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे, त्यापैकी किमान 100 प्रवाशांची कोविड-19 चाचणी झाली आहे. Corona Omicron Variant 1000 passengers from African countries came to Mumbai, only 100 people were tested
वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनाच्या डेल्टा प्रकारानंतर आता अवघ्या जगाने ओमिक्रॉन व्हेरिएंटची धसकी घेतली आहे. आफ्रिकी देशांत आढळलेल्या या व्हेरिएंटने आतापर्यंत 15 देशांमध्ये शिरकाव केला आहे. यामुळे भारतात आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांवरही करडी नजर ठेवण्यात येत आहे. तथापि, गत 15 दिवसांत आफ्रिकी देशांतून तब्बल 1,000 प्रवासी मुंबईत दाखल झाले, बीएमसीचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सोमवारी सांगितले की, आतापर्यंत ज्या 466 प्रवाशांची यादी प्राप्त झाली आहे, त्यापैकी किमान 100 प्रवाशांची कोविड-19 चाचणी झाली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने सोमवारी इशारा दिला की, प्राथमिक माहितीनुसार ओमिक्रॉन विषाणूचे नवीन स्वरूप जगासाठी धोकादायक आहे, त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात.
युनायटेड नेशन्स हेल्थ एजन्सीने सदस्य राष्ट्रांना एक तांत्रिक मेमोरँडम जारी केले आणि म्हटले की, नवीन फॉर्मबद्दल बरीच अनिश्चितता आहे. या नवीन स्वरूपाचे पहिले प्रकरण दक्षिण आफ्रिकेत नोंदवले गेले. काकाणी म्हणाले की, विमानतळ अधिकाऱ्यांनी आम्हाला सांगितले की, गेल्या १५ दिवसांत आफ्रिकन देशांतून सुमारे १,००० प्रवासी आले आहेत, मात्र आतापर्यंत ४६६ प्रवाशांची यादी देण्यात आली आहे.
काकाणी पुढे म्हणाले की, ‘466 प्रवाशांपैकी 100 प्रवाशांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्याचा अहवाल लवकरच येईल. त्यानंतरच त्यांना संसर्ग झाला आहे की नाही हे समजेल. जर त्यांना संसर्ग झाला नाही, तर काळजी करण्यासारखे काही नाही, परंतु संक्रमित लोकांच्या नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग केली जाईल. तसेच ‘ओमिक्रॉन’ तत्काळ शोधण्यासाठी WHOच्या सूचनेनुसार एस-जीन संबंधित चाचणी केली जाईल. प्रवाशाला ओमिक्रॉनची लागण झाली आहे की नाही याची खात्री ‘जीनोम सिक्वेन्सिंग’द्वारेच केली जाईल. त्यांनी सांगितले की संक्रमित आढळलेल्या सर्व प्रवाशांना महापालिकेच्या संस्थात्मक विलगीकरण केंद्र सेव्हन हिल्स रुग्णालयात ठेवण्यात येईल, त्यांना कोणतीही लक्षणे असो अथवा नसो.
Corona Omicron Variant 1000 passengers from African countries came to Mumbai, only 100 people were tested
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App