डब्ल्यूएचओने करोनाच्या या नव्या विषाणूवरून धोक्याचा इशारा दिला आहे. यावेळी राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले.Pune: Schools from 1st to 7th closed till December 15
विशेष प्रतिनिधी
पुणे : करोना विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्यानंतर जगातील अनेक देशांमध्ये खळबळ उडाली आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या नवीन प्रकाराला B.1.1.529 असे म्हटले असून त्याला ओमिक्रोन असे नाव देण्यात आले आहे. डब्ल्यूएचओने करोनाच्या या नव्या विषाणूवरून धोक्याचा इशारा दिला आहे.
यावेळी राज्यात अनेक निर्बंध घालण्यात आले. दरम्यान पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ही परिपत्रकाद्वारे शाळा सुरू करण्याबाबत माहिती दिली आहे.राज्यभरात उद्या (१ डिसेंबर)पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेश निर्गमित केले जात आहेत.इयत्ता पहिली ते सातवीचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App