भारतीय इंधन तेल कंपन्यांनी आज जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलबाबत लोकांना दिलासा मिळाला आहे.Steady decline in crude oil prices; New rates for petrol and diesel issued
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली :दिवाळीपूर्वी मोदी सरकारनं सर्वसामान्यांन दिलासा देत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये घट केली होती. दिवाळीच्या अगोदर इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात झाल्याने पेट्रोल-डिझेलच्या किमतीत ५ आणि १० रुपयांनी दिलासा मिळाला आहे.त्यानंतर आजपर्यंत पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही.
भारतीय इंधन तेल कंपन्यांनी आज जाहीर झालेल्या दरपत्रकानुसार पेट्रोल आणि डिझेलबाबत लोकांना दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं घट होत असल्याने पेट्रोल-डिझेलचे दर कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दिल्लीत पेट्रोलची किंमत १०३.९७ रुपये प्रति लिटर, तर डिझेलची किंमत ८६.६७ रुपये प्रति लिटर इतकी आहे.याशिवाय मुंबई शहरांत पेट्रोलची किंमत १०९.९८ रुपये प्रति लिटर आहे. तर डिझेलची किंमत ९४.१४ रुपये प्रति लिटर इतकी आहे. तर पुण्यात पेट्रोलची किंमत १०९.४५ रुपये प्रति लिटर असून डिझेलची किंमत ९२.२५ रुपये प्रति लिटर इतकी आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App