विशेष प्रतिनिधी
मुबंई : ओमिक्रॉन या कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिएंट मुळे जगभरात पुन्हा चिंता वाढली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये हा व्हेरिएंट सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेतुन येणार्या विमानांवर बऱ्याच देशांनी बंदी देखील घातलेली आहे. या पार्श्वभूमीवर भारतामध्ये देखील या व्हेरिअंटचे पेशंट आढळून आले तर.. याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
Due to the new variant of the corona’s Omicron found in South Africa, people coming from South Africa are being closely watched; Maharashtra Health Minister Rajendra Tope
महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेंद्र टोपे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, दुसरी लाट ही डेल्टा व्हेरिएंटमध्ये आली होती. आणि तिसरी लाट देखील अशाच एका व्हेरिएंटमध्ये येण्याची शक्यता आहे. जर वेळेत प्रसार थांबवला तर तिसरी लाट आपण थांबवू शकतो. फक्त इथे प्रत्येक नागरिकाला सतर्क राहावे लागेल. असे त्यांनी म्हटले आहे.
मंत्री राजेंद्र शिंगणेंनी राष्ट्रवादीचीच केली कोंडी, म्हणाले, ‘भाजपनं मागवलेलं रेमडेसिव्हिर राज्य सरकारलाच मिळणार होतं’
याविषयीची अधिक माहिती देताना ते म्हणतात की, आपण प्रत्येक जिल्ह्यातून महिन्याला साधारणत 100 सॅम्पल घेतो. त्याचे जिनोमिक्स सिक्वेन्सिंग करतो. त्यातूनच कळते कि डेल्टा व्हेरिएंट आहे की नाही. असे केल्यास सतर्कता बाळगण्यास मदत होते. अजून तरी कोणताही असा व्हेरिएंट आढळून आलेला नाहीये. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या लोकांवर बारकाईने लक्ष ठेवले जाते आहे. असे देखील त्यांनी यावेळी सांगितले आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App