प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकार चालले आहे. लवकरच भाजप सरकार गादीवर येईल अशा अटकळींचा बाजार आज अचानक गरम झाला आहे. केंद्रीय लघु सूक्ष्म आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी महाराष्ट्रात मार्चमध्ये भाजपा सरकार येईल असा भाकितयुक्त दावा केला आहे. त्यावर प्रसारमाध्यमांनी शरद पवार आज दिल्लीला रवाना झाले आहेत अशा बातम्या चिकटवून त्याचा संबंध महाराष्ट्रातले महाविकास आघाडी सरकारी जाण्याशी लावला आहे. The Mahavikas Aghadi government is going; Rane’s predictable claim; Pawar in Delhi; The speculation market is hot !!
शरद पवार हे संरक्षण विषयक संसदीय समितीच्या बैठकीसाठी दिल्लीच्या प्रवासात आहेत. दुपारी अडीच वाजता संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या बैठकीत ते सहभागी होणार आहेत. या बैठकीनंतर शरद पवार हे राजनाथ सिंह यांची स्वतंत्र भेट घेणार असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत आणि त्यातून महाविकास आघाडी सरकार जाऊन भाजप सरकार गादीवर येण्याच्या बातम्या सुरू केल्या आहेत.
जणू काही राजनाथ सिंह आणि शरद पवार यांची बैठक यासाठी “निर्णायक” असल्याचे भासविले जात आहे. भाजप अंतर्गत सत्ता समीकरणे लक्षात घेतली तर राजनाथ सिंह हे एखादे सरकार पाडणे आणि त्या जागी भाजप सरकार आणणे या प्रक्रियेत किती महत्त्वाची भूमिका पार पाडू शकतात? या विषयी शंका आहे. पण तरी देखील मराठी माध्यमांनी त्याच अटकळींचा बाजार गरम केला आहे.
नारायण राणे यांनी मार्च पर्यंत भाजप सरकार येण्याचा दावा केला आहे, हे खरे आहे. परंतु त्याचा बादरायण संबंध शरद पवार यांच्या दिल्ली भेटीशी माध्यमांनी लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातच चंद्रकांत दादा पाटील आणि देवेंद्र फडणवीस यांचा नुकताच देवलीत दिल्ली दौरा झाला आहे. त्यानंतर पवारांचा दौरा होत आहे. शिवाय प्रफुल्ल पटेल हे देखील दिल्लीत आहेत, अशा उपबातम्यांची फोडणी देखील या अटकळींना देण्यात आली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App