संविधानाची उद्देशिका स्वयंस्पष्ट आहे. नागरिकांना हक्क बहाल करतानाच, त्यांना अधिकारांची जाण- त्यांचे भान राहील असा समतोल आपल्या संविधानात आहे. Constitution Day: Best wishes from Chief Minister Uddhav Thackeray
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दरवर्षी २६ नोव्हेंबर हा दिवस देशात संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. २६ नोव्हेंबर हा राष्ट्रीय कायदा दिवस म्हणूनही ओळखला जातो. संविधानामुळेच आपल्याला स्वतंत्र देशाच्या स्वतंत्र नागरिकाची भावना जाणवते. राज्यघटनेत दिलेले मुलभूत अधिकार आपली ढाल बनून आपले हक्क देतात, तर त्यात दिलेल्या मुलभूत कर्तव्यांमध्ये आपण आपल्या जबाबदाऱ्यांची आठवण करून देतो.
दरम्यान संविधान दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. उद्धव ठाकरे म्हणले की, ‘हिंदुस्थान स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव म्हणजेच ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा करत आहोत. याच कारणामुळे यंदाचा ‘संविधान दिन’ आणखी औचित्यपूर्ण, विशेष महत्त्वाचा आहे,असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संविधान दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना, त्याची अमृत फळं सर्वच जनमानसाला चाखायला मिळावित यासाठी संविधानातील मार्गदर्शक तत्वांबाबत जागरूक राहुया. त्यांचा अंगिकार करूया, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
हा दिन साजरा करताना जगातील एक सार्वभौम आणि बलशाली प्रजासत्ताकाची निर्मिती करताना ‘नागरिक’ केंद्रबिंदू मानून, त्यांच्या अधिकार-हक्काला, हिताला संविधानात सर्वोच्च स्थान देण्यासाठी आपले ज्ञान, विद्वत्ता पणाला लावण्याचे अपूर्व योगदान देणाऱ्या संविधानाच्या शिल्पकारांना या निमित्ताने मानवंदना देणे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.
घटनेचे शिल्पकार महाराष्ट्र सुपुत्र भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह घटना समितीच्या सदस्यांना अभिवादन करतानाच मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की हिंदुस्थानी संविधान जगात मार्गदर्शक असे मानले जाते. संविधानाची उद्देशिका स्वयंस्पष्ट आहे. नागरिकांना हक्क बहाल करतानाच, त्यांना अधिकारांची जाण- त्यांचे भान राहील असा समतोल आपल्या संविधानात आहे.
न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता यातून राष्ट्रीय एकात्मता या मूल्यांचा अखंड जागर करणारे हे संविधान हिंदुस्थानी नागरिकांनी आजच्या दिवशी स्वतः ला समर्पित केले आहे. त्याच आधारावर आपली आतापर्यंतची सामाजिक, आर्थिक आणि राजकीय वाटचाल सुरू झाली आहे, ती आणखी लोकाभिमुख व्हावी.अस देखील संविधांन दिनानिमित्त उद्धव ठाकरे म्हणाले.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App