वृत्तसंस्था
इस्लामाबाद : देश चालविण्यासाठी सरकारकडे पैसे नसल्याचा दावा पंतप्रधान इम्रान खान यांनी केला आहे. त्यामुळे पाकिस्तान भिकेला लागल्याचे वृत्त आहे. Pakistan begs; Prime Minister Imran Khan claims that he has no money to run the country
देशाचा सर्वात मोठा प्रश्न हा पैशाची कमतरता आहे, असे सांगताना इम्रान खान याने आता परिस्थितीसमोर हात टेकल्याचे सांगितले आहे. आर्थिक प्रश्नामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे की, देश कसा चालवायचा हे समजत नाही, असे ते म्हणाले.
एकीकडे परकीय गंगाजळीचा ओघ पाकिस्तानात कमी झाला आहे. तसेच महसूल घटल्याने ही गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. याबाबतची चिंता त्यांनी राष्ट्रीय सुरक्षा परिषदेत व्क्त केली. गेल्या चार वर्षात ३.८ अब्ज डॉलरचे कर्ज काढले आहे. ते फेडता फेडता नाकीनऊ आल्याचा दावा त्यांनी केला आहे. जागतिक दहशतवादाचे केंद्र असलेल्या पाकिस्तानने विकासाकडे दुर्लक्ष करून दहशतवादाला प्रोत्साहन दिले. त्याचा मोठा फटका पाकिस्तानला बसला आहे, हे इम्रान खान यांच्या या वक्तव्यामुळे अधिकच स्पष्ट होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App