वृत्तसंस्था
सांगली : सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीत आमदार विक्रम सावंत पराभूत झाले आहेत. त्यामुळे राज्यमंत्री विश्वजित कदम यांना मोठा धक्का बसला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत जत विधानसभा मतदारसंघाचे आमदार विक्रम सावंत आणि भाजप पुरस्कृत उमेदवार प्रकाश जमदाडे यांची लढत झाली. जमदाडेना ४५ मते मिळाली तर विक्रम सावंत यांना ३८ मते पडली. MLA Vikram Sawant loses Sangli District Bank elections; big blow to Minister of State Vishwajit Kadam
विशाल पाटील ५२१६ मतांनी विजयी झाले आहेत. अजितराव घोरपडे यांना ५४ तर विजय विठ्ठल पाटील यांना १४ मतं मिळाली आहेत. जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीची सत्तेच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. वाळवा सोसायटी गट दिलीप तात्या पाटील १०८ मतांनी विजयी झाले आहेत तर भानुदास मोटे यांना २३ मतं मिळाली आहेत.
मिरज सोसायटी गटामध्ये विशाल पाटील (आघाडी) ५२ विजयी झाले तर उमेश पाटील (भाजप) यांना १६ मतं मिळाली. आटपाडी सोसायटी गटात तानाजी पाटील (आघाडी) ४० विजयी झाले. राजेंद्रअण्णा देशमुख (भाजप) यांना २९ मतं मिळाली. कडेगाव सोसायटी गट मोहनराव कदम (आघाडी) ५३ विजयी झाले. तुकाराम शिंदे (भाजप) यांना ११ मतं मिळाली. तासगाव सोसायटी गटात बी. एस. पाटील (आघाडी) ४१ विजयी झाले तर सुनील जाधव (भाजप) यांना २३ ऍड. प्रताप पाटील (अपक्ष) १५ मत मिळाली आहेत. कवठेमहांकाळ सोसायटी गटात अजितराव घोरपडे (आघाडी) ५४ विजयी झाले. विठ्ठल पाटील (अपक्ष) यांना १४ मते मिळाली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App