विशेष प्रतिनिधी
भोपाळ : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी मंडलामध्ये आदिवासी बांधवांसोबत ढोलवर नृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मंडलामध्ये आदिवासी गौरव दिन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान देखील सहभागी झाले होते. SHIVRAJ SINGH: Unique look of Shivraj Singh Chouhan! On the beat of a throbbing drum; Dancing with tribal brothers; Video goes viral
#WATCH | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan plays dhol, dances with the people from a tribal community, in Mandla (22.11) pic.twitter.com/kDuVOUDISg — ANI (@ANI) November 22, 2021
#WATCH | Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan plays dhol, dances with the people from a tribal community, in Mandla (22.11) pic.twitter.com/kDuVOUDISg
— ANI (@ANI) November 22, 2021
यावेळी त्यांचे अनोखे रूप पहायला मिळाले .त्यांनी ढोल वाजवत ठेका देखील धरला .मुख्यमंत्री नेहमीच आपली वेगळी शैली जनतेसमोर आणत असतात.मागे देखील त्यांनी हेलीपॅडवर ड्युटीवर कार्यरत असणाऱ्या मदर पोलीसच्या मुलीला कडेवर घेत तीला आशीर्वाद दिले होते.
या कायक्रमामध्ये मोठ्या संख्येने आदिवासी बांधव सहभागी झाले असून, ते आपल्या पारंपरीक पोशाखामध्ये नृत्य करत आहेत, तर त्यांच्यासोबतच मुख्यमंत्री चौहान यांनी देखील ढोल वाजवत नृत्य केले आहे.
या कार्यक्रमादरम्यान शिवराज सिंह चौहान यांनी मोठी घोषणा केली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आता दारूच्या दुकांनावर मोहापासून बनवण्यात आलेली दारू देखील विकता येणार आहे. सरकारने या दारूला अधिकृत परवानगी दिली आहे. मोहाच्या फुलापासून बनवण्यात आलेली दारू हेरिटेज दारूच्या नावाने दुकांवर विकता येईल. चौहान म्हणाले की, मोहाची फुले गोळा करणे आणि त्यापासून वेगवेगळ्या वस्तुंची निर्मिती करणे, हा आदिवासी लोकांचा पारंपरिक व्यवसाय आहे. यामधून मिळणाऱ्या पैशांमधून त्यांचे घर चालते.
कांग्रेस ने जनजातीय नायकों का सम्मान नहीं किया। भगवान बिरसा मुंडा,टंट्या मामा,शंकर शाह,रघुनाथ शाह जैसे नायकों के अनदेखा किया। हम इनके योगदान को सम्मान देंगे। मंडला के रामनगर आयोजित #जनजातीय_गौरव_सप्ताह के समापन समारोह में विचार साझा किया। https://t.co/AjDJXcQ6lf https://t.co/q8YKYt4bdh pic.twitter.com/ouK1Baost7 — Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) November 22, 2021
कांग्रेस ने जनजातीय नायकों का सम्मान नहीं किया। भगवान बिरसा मुंडा,टंट्या मामा,शंकर शाह,रघुनाथ शाह जैसे नायकों के अनदेखा किया। हम इनके योगदान को सम्मान देंगे।
मंडला के रामनगर आयोजित #जनजातीय_गौरव_सप्ताह के समापन समारोह में विचार साझा किया। https://t.co/AjDJXcQ6lf https://t.co/q8YKYt4bdh pic.twitter.com/ouK1Baost7
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) November 22, 2021
त्यांची आर्थिक प्राप्ती वाढावी, नवे आर्थिक स्त्रोत उपलब्ध व्हावेत यासाठी सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आम्ही मोहाच्या दारूला अधिकृत परवानगी दिली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App