भारतीय जनता पक्षाचे नेते सौमित्र खान यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे आमदार उदयन गुहा यांना सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ ) बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्याची मागणी केली. BJP leader Saumitra Khan seeks arrest of TMC’s Udayan Guha for his remarks on BSF
वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे नेते सौमित्र खान यांनी बुधवारी तृणमूल काँग्रेस (टीएमसी) चे आमदार उदयन गुहा यांना सीमा सुरक्षा दल ( बीएसएफ ) बद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्याबद्दल अटक करण्याची मागणी केली.
तृणमूल कॉंग्रेसचे नेते उदयन गुन्हा यांनी आरोप केला होता की, सीमा सुरक्षा दलाच्या जवानांनी सीमेवर तपासणीदरम्यान महिलांना अयोग्यरीतीने स्पर्श केला. या वादग्रस्त वक्तव्यावरून लगेच गुहा अटक करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्र लिहिणार असल्याचेही ते म्हणाले. बीएसएफचा अपमान केल्याबद्दल गुहा यांच्यावर भारतीय लष्कर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
बीएसएफच्या अधिकार क्षेत्रात वाढीच्या विरोधातील ठरावावरील चर्चेदरम्यान टीएमसीचे उदयन गुहा म्हणाले, “जेव्हा महिला सीमा ओलांडतात, तेव्हा तपासाच्या नावाखाली बीएसएफचे जवान त्यांना अयोग्यरीत्या स्पर्श करतात. त्यांनी कितीही भारत माता की जय म्हटले तरी ते देशभक्त असू शकत नाहीत.”
भाजप नेते सौमित्र खान वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना म्हणाले की, “मी पंतप्रधानांना पत्र लिहित आहे. उदयन गुहा यांना आजपर्यंत का अटक करण्यात आली नाही, देशाचे रक्षण करणाऱ्या आमच्या शूर जवानांना अशा प्रकारे लक्ष्य केले जात आहे, गुहा यांच्यावर तातडीने कारवाई झाली पाहिजे. गुन्हा दाखल झाला पाहिजे. भारतीय लष्करी कायद्यांतर्गत गुन्हा नोंद केला पाहिजे.”
विधानसभेत चर्चेदरम्यान भाजप आमदार मिहीर गोस्वामी यांनाही गुहा यांनी धमकी देत ‘तुम्ही परिसरात प्रवेश केलात तर तुमचे हातपाय तोडले जातील’, अशी म्हटले होते.
“उदयन गुहा हे लष्कराच्या विरोधात वक्तव्य करत आहेत, तृणमूल काँग्रेस मधील प्रत्येकजण देशद्रोही आहे ‘, असेही खान यांनी सांगितले. “जर त्यांच्यात हिंमत असेल तर ते सीमेवर का येत नाहीत,” असेही ते म्हणाले.
आंतरराष्ट्रीय सीमेच्या आत बीएसएफचे कार्यक्षेत्र 50 किमीपर्यंत वाढवण्याच्या केंद्राच्या निर्णयाविरोधातील ठरावावरील चर्चेदरम्यान तृणमूल आमदार उदयन गुन्हा यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
सीमा सुरक्षा दलाला आधी पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांमध्ये पंधरा किलोमीटरपर्यंत कारवाई करण्याचा अधिकार देण्यात आला होता, त्याला आता केंद्र किंवा राज्य सरकारांच्या कोणत्याही अडथळ्याशिवाय किंवा परवानगीशिवाय त्यांचे कार्यक्षेत्र 50 किलोमीटरपर्यंत वाढवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
तथापि, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय येथे त्यांचे कार्यक्षेत्र 80 किमी पर्यंत होते – पाच ईशान्येकडील राज्यांमध्ये त्याचे कार्यक्षेत्र 20 किमीने कमी केले गेले आहे. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये बीएसएफच्या कार्यक्षेत्रात 80 ते 50 किमीपर्यंत कपात करण्यात आली आहे. राजस्थानमध्ये, बीएसएफचे कार्यक्षेत्र ५० किमी इतकेच राहील.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App