विशेष प्रतिनिधी
सोलापूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची भव्य रांगोळी रेखाटली असून या माध्यमातून त्यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले आहे.१६ बाय १८ फूट रांगोळीतून बाळासाहेब ठाकरे रेखाटले आहेत. त्याद्वारे त्यांना मानवंदना देण्यात आली.Balasaheb Thackerays magnificent rangoli drawn
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नवव्या स्मृतिदिनानिमित्त शिवसेना शहर कार्यालय आणि विद्यार्थी सेनेच्या वतीने ही भव्य रांगोळी साकारली. रांगोळी काढण्यासाठी ६ रंग वापरले असून ४० तासांचा कालावधी लागला आहे.
यासाठी २७ किलो रांगोळीचा वापर करण्यात आला. सोलापुरातील चित्रकार सिद्धाराम नालवार, प्रेम आडकी आणि सायली घंटे या तिघांनी मिळून ही कलाकृती साकारली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App