आपण भाषा ऐकत असतो तेव्हा ब्रोका केंद्र ऐकण्याचं काम करणाऱ्या टेम्पोरल लोबचं सहकार्य होत असतं. हा टेम्पोरल लोब मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये असतो. तसेच ऐकलेलं समजून घेण्याचं कामही चालू असतं. आपण जर एखादं गाणं ऐकत असू तर भाषा, संगीत, गाण्यातल्या भावना, त्यातून आपल्या मनासमोर उभं राहणारं एक कल्पनाचित्र या साऱ्याचा मेळ साधला जातो. यामुळे डाव्या आणि उजव्या अशा दोन्ही अर्धगोलातल्या जास्तीत जास्त केंद्रांना काम मिळतं.Both children’s brains need to be stimulated
मेंदू जेव्हा कोणतंही काम करीत असतो, त्या वेळेला कधी डाव्या, कधी उजव्या तर कधी दोन्ही अर्धगोलांना चालना मिळण्याचं काम होत असतं. आता आपण शाळेतला पारंपरिक वर्ग डोळ्यासमोर आणू. उत्साहाने रसरसलेली, ज्यांचा मेंदू दर क्षणाला नवीन खाद्य खायला मागत असतो, असे पन्नास-साठ मेंदू तिथं असतात. त्यांच्यासमोर शिकवणं चालू असतं, ते खडू-फळा यांच्या साहाय्याने. या वर्गात कोणत्या भागाला जास्त काम असतं, ते बघू. शिक्षक पुस्तकातला धडा वाचून दाखवत आहेत,
मुलं ऐकत आहेत. शिक्षक फळ्यावर लिहीत आहेत. मुलं बघत आहेत. मुलं वाचन करताहेत. लेखन करताहेत यातून केवळ डाव्या मेंदूला काम मिळते. समोर पाठय़पुस्तक आहे. त्यात अक्षरं जास्त, चित्रं कमी. चित्रं रंगीत असतीलच असं सांगता येत नाही. म्हणजे पुन्हा डावा मेंदूच. यातल्या भाषेच्या पाठय़पुस्तकांमध्ये आवडतील अशा, भावनांना साद घालतील अशा गोष्टी असतीलही; पण धडय़ाखालच्या प्रश्नांमुळे पुन्हा उत्तर भावनांमध्ये द्यायचं नाही.
प्रश्नांची उत्तरं देणं हे डाव्या मेंदूचं काम. वर्गामध्ये बहुतेकदा डाव्या मेंदूला काम असतं. वास्तविक विचार करणं, तर्क करणं, अंदाज बांधणं, तपासून घेणं, प्रश्न पडणं, प्रश्न विचारणं, प्रश्नांची उत्तरं मनाच्या साहाय्याने शोधणं हे याच डाव्या मेंदूचं महत्त्वाचं काम आहे, पण त्याला चालना कमी दिली जाते. विचार करण्याचं काम सोपवलं जातंच नाही. तपशिलात जाऊन निष्कर्ष काढण्याचं काम बहुतेकदा सोपवलं जात नाही. प्रश्न विचारलेले चालत नाहीत. पाठय़पुस्तकाच्या बाहेर जाऊन निष्कर्ष काढणं हे मुलांचं काम नसतंच, त्यासाठी गाइड्स असतात. म्हणजे डाव्या मेंदूलाही पूर्ण न्याय दिला जात नाही. त्यामुळे मेंदूच्या डाव्या व उजव्या भागांना काम करण्याची संधी शाळेत द्यायला हवी.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App