वृत्तसंस्था
दुबई : विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला पराभूत केले. त्यामुळे त्यांचे अंतिम फेरीत जाण्याचे स्वप्न भंगले आहे.या पराभावामुळे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा एकापाठोपाठ सामने जिंकण्याचा विजयरथ रोखला आहे.Australia beat Pakistan in World Cup
भारताचा पहिला सामना पाकिस्तानबरोबर झाला. त्यात भारताचा पराभव झाला. त्यामुळे चाहते पाकिस्तानच्या पराभवाची वाटच पाहत होते. अखेर पाकिस्तानने ऑस्ट्रेलियासमोर गुढगे टेकले. त्यानंतर भारतात दिवाळी साजरी करण्यात आली.
T20 World Cup : शोएब अख्तर म्हणाला, टीम इंडियामध्ये दोन गट, एक कोहलीच्या विरुद्ध आणि दुसरा कोहलीसोबत!
दुबईत झालेल्या सामन्यात पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियाने ५ गडी राखून विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. पाकिस्तानने २० षटकात ४ बाद १७६ धावा केल्या.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने ३ गडी गमावले.पण डेव्हिड वॉर्नर, वेड आणि स्टॉइनिस यांनी झुंजार फलंदाजी करत १९व्या षटकात विजय मिळवला. १९व्या षटकात लागोपाठ तीन षटकार ठोकणाऱ्या वेडला सामनावीर पुरस्कार मिळाला. १४ नोव्हेंबरला ऑस्ट्रेलिया -न्यूझीलंड यांच्यात अंतिम सामना होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App