विशेष प्रतिनिधी
मुंबई : दररोज पत्रकार परिषद घेऊन वेगवेगळे आरोप करणारे अल्पसंख्यांक विभागाचे मंत्री आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रवक्ते नबाब मलिक यांना न्यायालयानेच फटकारले आहे. तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही कागदपत्रं आणि फोटो पोस्ट करताना त्याची सत्यता पडताळून पाहिलीत का? असा सवाल न्यायालयाने मलिक यांना केला आहे.The court also slapped Nabab Malik on baseless allegations, You are a minister, did you check the authenticity while posting documents and photos?
एनसीबीचे संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानेश्वर वानखेडे यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या दाव्याव उत्तर द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना दिले होते. समीर वानखेडे यांच्याविरोधात ट्विटरवर अपलोड केलेल्या कागदपत्रांची सत्यता पडताळून पाहिली का? असा प्रश्न करत नवाब मलिक यांनी आता अतिरिक्त प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. त्ज्ञानेश्वर वानखेडे यांना ट्विट खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.
समीर वानखेडे यांच्यासोबत वाद असताना त्यांची बहीण, मेहुणी, यांच्यावर आरोप करण्याचं कारण काय? यासंदर्भात आम्ही कायदेशीर नोटीस पाठवली आहे असा दावा वानखेडेंच्या बाजूने करण्यात आला. त्याबाबत तुमचा मुलगा सरकारी नोकरीत आहे. त्यावेळी सवाल उठणारच. तुम्ही हे आरोप खोटे आहेत हे सिद्ध करण्यासाठी कागदपत्रं सादर करा असे न्यायालयाने म्हटले आहे.
समीर वानखेडे यांचा जन्म दाखला आणि काही फोटो शेअर केले होते जे आधीच जाहीर झाले होते. ते फक्त पुन्हा पोस्ट केले असे मलिक यांच्यातर्फे न्यायालयात सांगितले गेले. त्यावेळी न्यायालयाने प्रश्न विचारला की तुम्ही एक लोकप्रतिनिधी आहात, मंत्री आहात. तुम्ही कागदपत्रं आणि फोटो पोस्ट कताना त्याची सत्यता पडताळून पाहिलीत का? लोकप्रतिनिधी, राष्ट्रीय पक्षाचे नेते म्हणून तुमची जबाबदारी नाही का?
मलिक यांनी प्रेस रिलीज, मुलाखती आणि समाजमाध्यमांद्वारे वानखेडे कुटुंबियांवर केलेल्या टिप्पण्या छळवणूक करणाऱ्या व बदनामीकारक असल्याचे जाहीर करावे आणि त्यापोटी १.२५ कोटी रुपये नुकसान भरपाई द्यावी, अशी विनंती ज्ञानदेव वानखेडे यांनी दाव्यात केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App