विशेष प्रतिनिधी
कल्याण – महाराष्ट्रातील गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा महाराष्ट्रातील सर्वात अवघड असलेला २६० फूट उंच आणि ९०अंश कोनात असलेला “वजीर” सुळका कल्याण शहरातील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर ह्या गिर्यारोहक संघाने सर केला आहे.
कल्याण मधील सह्याद्री रॉक ऍडव्हेंचर संघाने या मोहिमेचे आयोजन केले होते. यात पवन घुगे, दर्शन देशमुख, रणजित भोसले, भूषण पवार, अक्षय जामधरे, देविदास गायकवाड, महेश पाडवी हे सहभागी झाले.से सर्व तरुण कल्याण शहरातील रहिवासी आहेत.
या सर्व तरुणांनी सर्वात प्रथम सुळक्याच्या पायथ्याला शिवमूर्तीचे आणि सुळक्याचे हार नारळाने पूजन करून मोहिमेची सुरुवात केली. एक तासात दोरखंडाच्या सहाय्याने ते चढले. वजीर सुळका सर करतांना हा ५ स्थानकात भागला जातो. त्यात तब्बल १०० फुटांचा ओव्हरहँग झूमरिंग करून पार करावा लागतो.हा सुळका शहापूर तालुक्यातील वाशिंद स्थानकापासून जवळ आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App