एका महिला वैद्यकीय अधिकाऱ्यासह तीन परिचारिकांचा समावेश
विशेष प्रतिनिधी
अहमदनगर : येथील जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगप्रकरणी येथील तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या सदोष मनुष्यवधाचा गुन्ह्यात बुधवारी (9 नोव्हेंबर) सायंकाळी चार जणांना अटक करण्यात आली. AHAMADNAGAR FIRE: 4 arrested in Ahmednagar district hospital fire case
आरोपींमध्ये एक वैद्यकीय अधिकारी व तीन परिचारिकांचा समावेश आहे. वैद्यकीय अधिकारी विशाखा शिंदे, परिचारिका सपना पठारे, आस्मा शेख आणि चन्ना आनंत यांना अटक करण्यात आली आहे.
अटक करण्यात आलेल्यांपैकी शिंदे आणि पठारे यांना निलंबित करण्यात आलेलं आहे, तर शेख आणि आनंत यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा राज्य सरकारच्या आरोग्य विभागाचा आदेश आहे.
दरम्यान, जिल्हा रुग्णालयातील परिचारिका संघटनांनी परिचारिकांना या गुन्ह्यात अटक केल्यामुळे निषेध नोंदवला असून ही कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप केला आहे.
आग प्रकरणातील प्रमुख सुत्रधाराला अटक करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली असून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुनील पोखरणा यांच्यासह सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App