प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मान आणि मणक्याचा त्रास सुरु झाला आहे. मुख्यमंत्र्यांच्या पाठीचा मणका आणि मानेच्या स्नायूच्या दुखापतीचा त्रास बळावल्याची माहिती मिळतेय. तसेच उद्धव ठाकरे यांना मागील आठवड्यापासून हा त्रास जाणवू लागला असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांत महत्वाची शस्त्रक्रिया होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.CM suffers from neck and spine problems
विधान परिषदेच्या सहा जागांसाठी १० डिसेंबरला निवडणूक, महाविकास आघाडीची लागणार कसोटी
गिरगावमधील एच. एन. रिलायन्स रुग्णालयात डॉ. शेखर भोजराज हे मुख्यमंत्र्यांवर शस्त्रक्रिया करणार असल्याचे समजते. उद्धव ठाकरे यांना मागील काही दिवसांपासून मणका आणि मानेच्या स्नायूंचा त्रास असल्याने सोमवारी गिरगावातील सर एच. एन. रिलायन्स हॉस्पिटलमध्ये आरोग्य तपासणी केली होती. या तपासणीदरम्यान, त्यांच्या काही शारीरिक चाचण्या करण्यात आल्या होत्या.
गेल्या अनेक दिवसांपासून हा त्रास जाणवत असल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी भेटीगाठी टाळल्या आहेत. त्यांनी दिवाळीनिमित्त वर्षाबंगल्यावर येणाऱ्या पाहुण्यांकडून शुभेच्छा घेणे देखील टाळले होते. पुढील उपचारासाठी मुख्यमंत्र्यांना काही दिवस रुग्णालयात दाखल व्हावे लागण्याची शक्यता होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App